1
उत्पत्ती 32:28
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 32:28
2
उत्पत्ती 32:26
मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.”
Mikaroka उत्पत्ती 32:26
3
उत्पत्ती 32:24
याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली.
Mikaroka उत्पत्ती 32:24
4
उत्पत्ती 32:30
मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.”
Mikaroka उत्पत्ती 32:30
5
उत्पत्ती 32:25
याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली.
Mikaroka उत्पत्ती 32:25
6
उत्पत्ती 32:27
त्याने मग त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो म्हणाला, “याकोब.”
Mikaroka उत्पत्ती 32:27
7
उत्पत्ती 32:29
मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला.
Mikaroka उत्पत्ती 32:29
8
उत्पत्ती 32:10
तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.
Mikaroka उत्पत्ती 32:10
9
उत्पत्ती 32:32
म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत; ह्याचे कारण हेच की, त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला.
Mikaroka उत्पत्ती 32:32
10
उत्पत्ती 32:9
मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन.
Mikaroka उत्पत्ती 32:9
11
उत्पत्ती 32:11
मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.
Mikaroka उत्पत्ती 32:11
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary