मत्तय 28

28
येशुनं पुनरूत्थान
(मार्क १६:१-१०; लूक २४:१-१२; योहान २०:१-१०)
1 # २८:१ शब्बाथ दिन शब्बाथना शेवट रविवारना दिन उजाडताच मग्दालीया मरीया अनं दुसरी मरीया ह्या कबर दखाले वनात. 2तवय दखा, मोठा भूकंप व्हयना; कारण प्रभुना दूतनी स्वर्गमातीन उतरीसन धोंड एकबाजुले लोटी अनं तिनावर तो बठना. 3त्यानं रूप विजनामायक व्हतं अनं त्याना कपडा बर्फनामायक व्हतात. 4पहारेकरी त्याले घाबरी थरथर कापाले लागनात अनं मरेलना मायक व्हई गयात.
5देवदूत त्यासले बोलणा, “तुम्हीन घाबरू नका,” क्रुसखांबवर खियेल येशुले तुम्हीन शोधी राहिनात, हाई माले माहित शे. 6तो आठे नही शे, कारण त्यानी सांगेल प्रमाणे तो जिवत व्हयेल शे, या, प्रभु झोपेल व्हता ती हाई जागा दखा.
7अनी लवकर जाईसन त्याना शिष्यसले सांगा की तो मरेल मातीन उठेल शे, दखा तुमना पहिले गालीलमा जाई राहिना, तठे तुम्हीन त्याले दखशात, दखा, मी तुमले हाई सांगेल शे.
8तवय त्या बाया घाबरीन अनं भलताच खूश व्हईसन लगेच कबरपाईन निंघीन त्याना शिष्यसले हाई गोष्ट सांगाले पळण्यात.
9मंग दखा येशु त्यासले भेटीन बोलणा, “शांती असो,” त्यासनी जोडे जाईसन त्याना पाय धरीन त्याले नमन करं. 10तवय येशु त्यासले बोलणा, “घाबरू नका, जा अनी हाई मना भाऊसले सांगा, यानाकरता की त्यासनी गालीलमा जावाले पाहिजे, तठे त्या माले दखतीन.”
पहारेकरीसना निरोप
11जवय त्या जाई राहिंत्यात, तवय दखा, पहारेकरीसमातीन बराच जणसनी नगरमा जाईन घडेल सर्व गोष्ट मुख्य याजकसले सांगी. 12तवय त्यासनी अनं वडील लोकसनी मिळीन योजना बनाडी अनी पहारेकरीसले बराच चांदीनां शिक्का दिधात 13अनी सांगं की, “आम्हीन झोपेल व्हतुत तवय त्याना शिष्यसनी रातले ईसन त्याले चोरी लई गयात, अस सांगा 14अनी सुबेदारना कानवर हाई गोष्ट गई तर आम्हीन त्याले समजाडीन तुमले चितांमुक्त करसुत.”
15मंग त्यासनी चांदीना शिक्का लिसन त्यासले जश सांगेल व्हतं तसच करं, अनी हाई गोष्ट यहूदी लोकसमा पसरनी, अनी आजपावत तशीच चालु शे.
येशु शिष्यसले दखायना
(मार्क १६:१४-१८; लूक २४:३६-४९; योहान २०:१९-२३; प्रेषित १:६-८)
16 # मत्तय २६:३२; मार्क १४:२८ इकडे अकरा शिष्य गालीलमा जो डोंगर येशुनी सांगी ठेयल व्हता त्यानावर गयात. 17अनी त्यासनी त्याले दखीन नमन करं तरी बराच जणसले शंका वाटनी. 18तवय येशु जोडे ईसन त्यासले बोलणा, “स्वर्गमा अनी पृथ्वीवर सर्वा अधिकार माले देयल शे. 19#प्रेषित १:८यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, 20अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे.”

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요