मत्तय 2

2
ज्योतिषी लोके येशु बाळना दर्शनले येतस
1जवय हेरोद राजा व्हता. तवय यहूदीयातील प्रांतमा बेथलहेम गावमा येशुना जन्मनंतर, दखा पुर्व दिशाकडतीन ज्योतिषी#२:१ ज्योतिषी; आकाशमातील तारासना अभ्यास करनारा लोके येरूशलेमले ईसन ईचार-पुस करू लागनात. 2“यहूदीसना राजा जन्मना तो कोठे शे? कारण आम्हीन पुर्व दिशाले तारा दखीसन त्याले नमन कराले येल शेतस.” 3हेरोद राजानी जवय हाई ऐकं तवय तो अनं पुरं यरूशलेम घाबरी गयं. 4तवय त्यानी लोकसना मुख्य याजक, अनी शास्त्रीसले बलाईसन ईचारं की, ख्रिस्तना जन्म कोठे व्हणार शे? 5त्यासनी त्याले सांगं, “यहूदीयाना बेथलहेम गावमा” कारण संदेष्टासनाद्वारा असच लिखेल शे, की. 6“हे यहूदाना प्रदेश बेथलहेम? तु यहुदाना सर्व सरदारसमा कनिष्ठ शे; अस अजिबात नही? कारण मना इस्त्राएल लोकसले संभाळी असा सरदार तुनामातीन निंघी.”
7तवय ज्योतिषीसले हेरोद राजानी गुपचुप बलाईसन तारा दखावानी येळ नीट ईचारी लिधी. 8त्यासले बेथलहेमले धाडतांना सांगं, “तुम्हीन जाईसन त्या बाळबद्दल नीट ईचारपुस करा, शोध लागी तवय माले बी निरोप द्या, म्हणजे मी पण ईसन त्याले नमन करसु.” 9राजानं बोलनं ऐकीसन त्या तठेन निंघनात त्यासनी जो तारा पुर्व दिशाले दखेल व्हता, जठे ते बाळ व्हतं. त्या जागावर जाईसन पोहचत नही तोपावत त्यासनापुढे चालना. 10त्या ताराले दखीसन त्या भलताच खूश व्हयनात. 11जवय त्या घरमा गयात, तवय बाळले त्यानी माय मरीया जोडे त्यासनी दखं. अनं त्यासनी त्याना पाया पडीसन त्याले नमन करं, त्यासनी त्यासन्या थैल्या सोडीसन त्यानामाईन सोनं, ऊद, गंधरस, हाई त्याले अर्पण करं. 12मंग सपनमा परमेश्वर कडतीन त्यासले सूचना भेटनी की, हेरोद राजाकडे परत जावानं नही, म्हणीसन त्या दूसरी वाटतीन त्यासना देशमा निंघी गयात.
मिसर देशमा जाणं
13ज्योतिषी लोके जावानंतर प्रभुना दूतनी योसेफले सपनमा दर्शन दिसन सांगं, “ऊठ, बाळले अनी त्यानी मायले लिसन मिसर देशमा पळी जाय, मी तुले सांगस नही तोपावत तु तठेच ऱ्हाय.” कारण बाळले मारासाठे हेरोद त्याना शोध कराव शे? 14मंग तो ऊठना अनं रातमाच बाळले अनी त्यानी मायले लिसन मिसर देशमा पळी गया. 15अनी हेरोद मरस पावत त्या तठेच ऱ्हायनात, “मी मना पोऱ्याले मिसर देशमातीन बलायेल शे.” जे प्रभुने संदेष्टासनाद्वारा सांगेल व्हतं, ते पुरं व्हवाले पाहिजे म्हणीसन अस व्हयनं#होशेय ११:१.
धाकला पोऱ्यासनी हत्या
16ज्योतिषीसनी आपले फसाडं म्हणीसन हेरोद भलता संतापना अनं जी माहिती ज्योतिषीसपाईन नीट ईचारी लेयल व्हती, तिना प्रमाणे बेथलहेम अनी आस-पासना सर्व गावसमा ज्या दोन वरीसना अनी त्यानापेक्षा कमी वयना पोऱ्या व्हतात, त्या सर्वासले त्यानी शिपाई धाडीसन मारी टाकं. 17यिर्मया संदेष्टानाद्वारे जे सांगेल व्हतं; त्या येळले ते पुर्ण व्हयनं ते अस; 18रामा गावमा रडानं अनं आक्रोशसना शब्द ऐकाले वनात. राहेल तिना पोऱ्यास करता भलती रडी ऱ्हायनी शे, त्या ऱ्हायनात नहीत म्हणीसन तिनं समाधान व्हई नही ऱ्हायनं#यिर्मया १:१५.
मिसर देशतीन परत येणं
19मंग हेरोद राजा मरानंतर, प्रभुना दूत मिसर देशमा योसेफले सपनमा दर्शन दिसन बोलना. 20ऊठ, बाळले अनी त्याना मायले लिसन इस्त्राएल देशमा निंघी जाय, कारण ज्या बाळले माराले दखी राहींता, त्या मरी जायेल शेतस. 21तवय तो झोपमाईन ऊठना बाळले अनी त्यानी मायले लिसन इस्त्राएल देशमा वना; 22पण अर्खेलाव हाऊ त्याना बाप हेरोदना जागावर यहूदीयामा राज्य करी, ऱ्हाईंता हाई ऐकीसन योसेफ तठे जावाले भ्यायना अनं सपनमा सुचना भेटनी त्याना प्रमाणे तो गालील प्रांतमा निंघी गया. 23#मार्क १:२४; लूक २:३९; योहान १:४५अनं नासरेथ नावना गावले जाईसन ऱ्हाईना, ते यानाकरता की त्याले नासोरी म्हणतीन; हाई जे संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं, ते पुरं व्हई.#लूक १८:७

Currently Selected:

मत्तय 2: NTAii20

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in