मत्तय 9
9
एका लकव्याच्या माणसाले बरं करणे
(मार्क 2:1-12; लूका 5:17-26)
1मंग येशू डोंग्यात चढून तिकडल्या बाजूने गेला, अन् आपल्या नगरात आला. 2अन् पाहा, काई लोकायन एका लकव्याच्या माणसाले चटईवर घेऊन त्याच्यापासी आणलं, अन् येशूनं त्या लोकायचा विश्वास पावून त्या लकव्याच्या माणसाले म्हतलं कि “पोरा, धीर ठेव, मी तुह्या पापाले क्षमा करतो.” 3तवा बरेचसे मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं त्या घरी बसले होते, ते आपल्या मनात असा विचार करून रायले होते कि “हा देवाची निंदा करू रायला हाय.”
4येशूनं त्यायच्या मनातल्या गोष्टी जाणून म्हतलं, “कि तुमी तुमच्या मनात असा विचार नाई करायले पायजे. 5यातून माह्यासाठी कोणतं सोपे हाय? तुह्या पापाची क्षमा झाली हाय, असं लकव्याच्या माणसाले म्हणनं की असं म्हणनं उठ, आपली चटई उचलून चाल फिर. 6पण मी, जो माणसाचा पोरगा हावो, पृथ्वीवर पापाची क्षमा कऱ्याचा अधिकार हाय” तवा त्यानं लकव्याच्या माणसाकड़े फिरून पायलं अन् म्हतलं, “मी तुले सांगतो, उठ अन् आपली चटई उचलून आपल्या घरी चालला जाय.” 7तवा तो उठून आपल्या घरी चालला गेला. 8लोकं हे पावून हापचक झाले अन् देवाचा गौरव करू लागले, ज्यानं माणसाले असा अधिकार देला हाय.
येशूनं मत्तयले बलावलं
(मार्क 2:13-17; लूका 5:27-32)
9ततून समोर जाऊन येशूनं मत्तय नावाच्या एका कर घेणाऱ्याले पायलं, तो हल्फईचा पोरगा होता, अन् तो आपल्या जकात घेणाऱ्या नाक्यावर बसला होता, तवा येशूनं त्याले पाऊन म्हतलं, कि “माह्या संग ये अन् माह्य अनुकरण कर” तवा तो उठून त्याच्या मांग निघाला. 10जवा येशू अन् त्याचे शिष्य घरी रात्रीचं जेवण करून रायले होते, तवा त्या ठिकाणी लय जकातदार व पापी लोकं जेव्याले पंगतीत बसलेले होते.
11हे पावून परुशी लोकायन येशूच्या शिष्यायले म्हतलं कि “तो पापी अन् करवसुली करणाऱ्या संग कावून जेवण करून रायला हाय?” 12-13हे आयकून येशूनं त्यायले असं म्हतलं, “कि निरोगी लोकायले वैद्याची (डॉक्टराची) गरज नाई, पण रोगी लोकायले गरज हाय. म्हणून तुमी जाऊन याचा अर्थ शिका, कि मले बलिदान नाई पण दया पायजे, कावून कि मी धर्मी लोकायले नाई पण पापी लोकायचे आपल्या पापापासून मन फिरवायले आलो हाय.”
योहानाचे शिष्य उपासावर प्रश्न करतात
(मार्क 2:18-22; लूका 5:33-39)
14तवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्यायनं येऊन येशूले विचारले, कि काय कारण हाय कि “आमी अन् परुशी लोकं उपास करतो, पण तुह्यावाले शिष्य उपास कावून करत नाईत?” 15येशूनं त्यायले म्हतलं “जोपरेंत माह्यावाले शिष्य माह्या संग हायत ते उपास कसे करतीन? कावून की ते खुश हायत, जसे एका नवरदेवाचे मित्र लग्नात आनंद करतात त्यावाक्ती ते उपास कसे करतीन पण ते दिवस येतीन जवा नवरदेव त्यायच्या पासून दूर केल्या जाईन तवा ते उपास करतीन.
16कोणी कोण्या नव्या कपड्याचा तुकडा जुन्या कपड्याले लावत नाई, लावला तर थीगय करण्यासाठी लावलेला तुकडा चिमून जाईन अन् जुना कपडा आणखी जास्त फाटते अन् शेद्र मोठे होते. तसेच जर माह्या शिकवणी सोबत जुने रीतीरिवाज लावसान तर त्या शिकवणुकीचा काई उपयोग रायणार नाई. 17नव्या अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवत नाई, पण जर नवीन अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवलं तर चामळ्याच्या थयल्या फाटते, अन् अंगुराचा रस नाश होते, म्हणून नवीन अंगुराचा रस नवीन चामळ्याच्या थयल्यात ठेवतात, तवा ते दोन्ही नाश होतं नाई.”
मेलेल्या पोरीले बरं करणे
(मार्क 5:21-43; लूका 8:40-56)
18जवा तो ह्या गोष्टी सांगूनचं रायला होता, कि याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व तो येशूले पावून, त्याच्या समोर टोंगे टेकून, नमन केलं, त्यानं हे म्हणून येशूले विनंती केली, की माह्याली लायनी पोरगी मरून रायली हाय, तू येऊन तिच्यावर हात ठेव की ती बरी होऊन वाचली पायजे. 19मंग येशू जवा आपल्या शिष्याय संग त्याच्या मांग जाऊन रायला होता.
20अन् तती एक बाई होती, जिले बारा वर्षापासून रक्तस्रावाची बिमारी होती. तिनं येशूच्या चमत्काराच्या कामाबद्दल आयकलं तवा ती त्या गर्दीत गेली अन् येशूच्या मांगून येऊन त्याच्या कपड्याच्या काठाले स्पर्श केला. 21कावून कि ती आपल्या मनात म्हणत होती, जर मी त्याच्या कपड्याले जरी हात लावीन तर चांगली होऊन जाईन. 22येशूनं मांग फिरून तिले पायलं, अन् म्हतलं, “पोरी तुह्यावाल्या विश्वासानं तू बरी झाली हाय.” अन् ती बाई तवाच वाचली झाली.
23जवा येशू त्या सुभेदाराच्या घरी पोहचला, तवा त्यानं तती बासुरी वाजवणाऱ्यायले अन् लोकायले आरडा-ओरड करतांनी पायलं 24तवा येशूनं त्यायले म्हतलं, बाजुले व्हा, पोरगी मेली नाई पण झोपली हाय, यावर ते त्याची मजाक उडवाले लागले. 25पण जवा लोकायच्या गर्दीले बायर काढलं तवा येशूनं घराच्या अंदर जावून पोरीच्या हाताले पकडलं अन् ती जिवंत झाली. 26अन् ह्या गोष्टीची चर्चा त्या देशात बऱ्याचं जागी पसरली.
फुटके चा विश्वास
27जवा येशू ततून समोर गेला, तवा दोन फुटके त्याच्यावाल्या मांग हे म्हणत येत होते, कि “हे दाविद राजाच्या पोरा, आमच्यावर दया कर.” 28जवा येशू घरी पोहचला, तवा ते फुटके त्याच्यापासी आले, तवा येशूनं त्यायले म्हतलं, “काय तुमाले विश्वास हाय, कि मी तुमाले बरं करू शकतो” त्यायनं म्हतलं “हो प्रभू.”
29-30तवा येशूनं त्यायच्या डोयायले स्पर्श करून म्हतलं, “तुमच्या विश्वासानं तुमाले चांगलं केलं हाय” अन् त्यायले पटकन दिसू लागलं, अन् येशूनं त्यायले चेतावून सांगतल, “सावधान, कोणाले पण हे गोष्ट मालूम होऊ देऊ नका कि मी तुमाले बरे केले हाय.” 31पण त्या दोन फुटक्यायनं जाऊन साऱ्या देशात येशूची कीर्ती गाजवली.
मुक्याले बरं करणे
32जवा येशू अन् त्याचे शिष्य रस्त्यानं जाऊन रायले होते, तवा पाहा, काई लोकं एका मुक्याले ज्याच्यात भुत आत्मा होती त्याले त्याच्यापासी आणलं.
33जवा येशूने भुत आत्म्याले त्याच्या अंदरून काढले, तवा तो मुका बोलू लागला, अन् लोकायन आश्यर्य करून म्हतलं, “इस्राएल देशात आतापर्यंत असं कधीच पायण्यात आलं नाई.” 34पण परुशी लोकायन म्हतलं, “हा तर भुत आत्म्याच्या सरदार सैतानाच्या ताकतीने भुतायले काळतो.”
मजुरायले पाठव्याची विनंती
35अन् त्याच्या बाद येशू गालील प्रांतातील बऱ्याचं जागी त्यायच्या धार्मिक सभास्थानात जाऊन देवाच्या वचनाचा प्रचार करत जाय, अन् तो देवाच्या राज्याची सुवार्था सांगत गावा-गावात हिंडला, अन् लोकायच्या सर्व प्रकारच्या बिमाऱ्या अन् कमजोरीले बरं करत होता. 36जवा येशूनं मोठ्या गर्दीले पायलं, तवा त्याले त्यायच्यावर दया आली, कावून कि ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते ज्यायचा कोणी मेंढपाळक नाई होता, अन् ते भटकलेल्या सारखे होते.
37तवा त्यानं आपल्या शिष्यायले म्हतलं, “जसे शेतीत पीकं लय असते तसेच लोकं लय हायत जे देवाच्या संदेश आयक्याले तयार हायत पण देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगणारे लोकं कमी हायेत. 38म्हणून वावराच्या मालकाले म्हणजे देवाकडे प्रार्थना करा, कि त्यानं आपल्या वावरातले पीकं कापण्यासाठी मजुरायले पाठवाव.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.