मत्तय 6

6
दान देण्याच्या विषयात शिकवण
(लूका 11:2-4)
1“सावधान राहा! तुमी माणसाले दाखव्यासाठी चांगले काम नका करू, नाई तर आपल्या स्वर्गातल्या बापापासून काईच आशीर्वाद प्राप्त नाई करसान. 2म्हणून जवा तू दान करतोस, तवा मोठा दिखावा करू नको, जसं कपटी लोकं धार्मिक सभास्थानात अन् गल्ल्याईत करतात, ह्या साठी कि लोकं त्यायची वाह-वाह करावं; मी तुमाले खरं सांगतो कि देवबाप त्यायले प्रतिफळ नाई देईन ज्यायले लोकायपासून वाह-वाह भेटते
3पण जवा तू दान करशीन, तवा दुसऱ्या लोकायले माहीत नाई व्हावं. 4यासाठी कि तुह्याले दान गुप्त राहावं, अन् तवा तुह्याला स्वर्गीय बाप जो गुप्त मध्ये पायते, तो तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.”
प्रार्थनाच्या विषयात शिकवण
(लूका 11:1-4)
5“जवा तू प्रार्थना करशीन, तवा कपटी लोकायसारखा बनू नको, कावून कि जसं कपटी लोकं धार्मिक सभास्थानात अन् गल्ल्याईत प्रार्थना करतात, ह्या साठी कि लोकं त्यायची वाह-वाह करावं. मी तुमाले खरं सांगतो कि त्यायले आपलं प्रतिफळ भेटून गेलं हाय ज्यायनं लोकायच्या वाह-वाह घेतली हाय. 6पण जवा तू प्रार्थना करशीन, तवा आपल्या झोपडीत जा, अन् दरवाज्याले बंद करून आपल्या देवाले प्रार्थना कर, तवा तुह्याला स्वर्गातला देवबाप जो गुप्त मध्ये तुले पायते, तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.
7प्रार्थना कऱ्याच्या वाक्ती जगातल्या दुसऱ्या लोकायसारखे शब्दाले वारणवार बोलण्याच्यान बकबक नको करू, कावून कि त्यायले वाटते कि त्यायच्या लय बोलल्याने त्यायचं आयकलं जाईन. 8म्हणून तुमी त्यायच्या सारखे होऊ नका, कावून कि तुमचा स्वर्गीय बाप तुमच्या मांगण्याच्या पयलेच ओयखते कि तुमची काय आवशक्ता हाय.”
प्रभूने शिकवलेली प्रार्थना
9“आता तुमी अशाप्रकारे प्रार्थना करत जा, हे आमच्या देवबापा, तू जो स्वर्गात हायस, तुह्याल्या पवित्र नावाचा आदर केला जावो. 10तुह्यालं राज्य येवो, तुह्याली इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते, तशीच पृथ्वीवर पण पूर्ण हो. 11आमची दिवसभऱ्याची भाकर रोज आमाले दे, 12अन् ज्याप्रकारे आमी आमच्या अपराध्यायले क्षमा केले हाय, तसेच तू पण आमचे अपराध क्षमा कर.
13अन् आमाले परीक्षेत पाडू नको, पण सैतानापासून सोडवं, कावून कि राज्य अन् पराक्रम अन् गौरव सर्वदा तुह्याली असो. आमेन. 14म्हणून जर तुमी माणसायचे अपराध क्षमा करसान, तर तुमचा स्वर्गातला देव पण तुमचे अपराध क्षमा करीन. 15अन् जर तुमी माणसायचे अपराध क्षमा करसान नाई, तर तुमचा देव पण तुमचे अपराध करणार नाई.”
उपासाच्या विषयात शिकवण
16“जवा तुमी उपास करसान, तवा कपटी लोकायसारखी तुमच्या तोंडावर उदाशी नसली पायजे, कावून कि ते स्वताले दुखी दाखवतात, ह्या साठी कि लोकायन त्यायले उपास करणारे लोकं समजावं, जसं कपटी लोकं सभास्थानात अन् गल्ल्याईत करतात, ह्या साठी कि लोकं त्यायची वाह-वाह करे. मी तुमाले खरं सांगतो कि, त्यायले आपलं प्रतिफळ भेटून गेलं हाय, ज्यायनं लोकायची बढाई घेतली.
17पण जवा तू उपास करशीन तवा आपल्या डोक्शावर तेल लावं, अन् तोंड धून घे. 18यासाठी कि लोकं नाई, पण तुमचा स्वर्गीय बाप जो गुप्त जाग्यावर हाय, तुले उपासी समजीन, व तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.”
स्वर्गात धन एकत्र करा
(लूका 12:33-34; 11:34-36; 16:13)
19“आपल्यासाठी पृथ्वीवर धन एकत्र नको करू, जतीसा कीडा अन् जंग खराब करतात, अन् जती चोर शेद्र पाडतात अन् चोरून घेऊन जातात. 20पण चांगले काम करून, आपल्यासाठी स्वर्गात प्रतिफळ मिळाले पायजे हा विश्वास ठेव, जती ना कीडा हाय अन् ना काई खराब करत, अन् जती चोर शेद्र पाडून चोरून घेऊन जाऊ शकत नाई. 21कावून कि जती तुह्यालं धन हाय, ततीसाक तुह्यालं मन पण लागून राईन.”
शरीराचा दिवा
22“डोया तर शरीराच्या दिवा सारखा हाय, म्हणून जर तुह्याला डोया शुद्ध हाय, तर तुह्यालं सर्व शरीर पण ऊजीळमय होईन.
23जर तुह्यी पायण्याची नजर बेकार हायत तर तुह्या सगळं शरीर पण अंधारासारखं होईन, म्हणून तू हा विचार करत हाय, कि तुह्य मन प्रकाशमान हाय, पण खऱ्या मध्ये प्रकाशमान नाई, पण अंधारात हाय, तवा तुह्या अंदर जो अंधार हाय, तो अंधार केवढा मोठा राईन.”
कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका
(लूका 12:22-34)
24“कोणी माणूस एकाच वेळी दोन मालकाची सेवा करू शकत नाई, कावून कि तो एका संग वैर अन् दुसऱ्या संग प्रेम करीन, अन् एका संग मिळून राईन अन् दुसऱ्याले तुच्छ समजीन, तुमी देव अन् धन दोघाची सेवा करू शकत नाई. 25म्हणून मी तुमाले सांगतो, आपल्या शारीरिक जीवनासाठी हे चिंता करू नका, कि आपण काय खावावं अन् काय पीवावं, अन् नाई आपल्या शरीरासाठी कि काय घालावं, कावून की जीव जेवणाहून अधिक, अन् शरीर कपड्याहून अधिक मोठं हाय.
26अभायातल्या पाखरायले पाहा, नाई ते जमिनीत पेरतात अन् नाई कापतात अन् कोठाऱ्यात एकत्र करत नाईत, तरी पण तुमचा स्वर्गातला देवबाप त्यायले खाऊ घालतो, तुमचं मूल्य त्याहून अधिक हाय. 27तुमच्याईत कोण हाय, जो चिंता करून आपल्या वयात एक घडीपण वाढवू शकते?”
28“अन् कपड्या साठी कावून चिंता करता, फुलावर ध्यान करा, कि ते कसे वाढतात, ते नाई मेहनत करत, अन् नाई आपल्यासाठी कपडे बनवत. 29तरी पण मी सांगतो, सुलैमान पण आपल्या सर्व्या वैभवात त्या फुलातून कोणाच्याही सारखे सुंदर कपडे घातलेला नव्हता. 30म्हणून जर देव मैदानाचे गवत जे आज हाय अन् उद्या आगीत टाकल्या जाईन, असे सुंदर कपडे घालून देतो, तर देवबाप तुमाले याच्या पेक्षा सुंदर कपडे घालून देईन, देव तुमच्यासाठी यापेक्षा जास्त करीन, मंग तुमच्यापासी असा लहान विश्वास कावून हाय?”
31“म्हणून तुमी चिंता करून हे नका म्हणू, कि आपण काय खावावं, अन् काय पीवावं या काय घालावं? 32कावून कि जगातील दुसरे लोकं पण या प्रयत्नात रायतात, पण तुमचा स्वर्गातल्या देवाले माहीत हाय कि तुमाले या वस्तुची गरज हाय.
33म्हणून तुमी पयले देवाच्या राज्याचा अन् धार्मिकतेचा शोध करा तवा हे सगळ्या वस्तु तुमाले भेटून जातीन. 34आता उद्याची चिंता नका करू, कावून कि उद्याचा दिवस स्वता आपली चिंता करणार आजच्या दिवसासाठी आजचं दुख लय हाय.”

ハイライト

シェア

コピー

None

すべてのデバイスで、ハイライト箇所を保存したいですか? サインアップまたはサインインしてください。