मत्तय 2

2
ज्योतिषी लोकं येशू बाळाचे दर्शन घेयाले येतात
1जवा हेरोद राजा यहुदीया प्रांतावर शासन करत होता, तवा येशूचा जन्म त्या प्रांताच्या बेथलहेम गावात झाला, तवा पूर्व दिशेतून बरेचं ज्योतिषी यरुशलेम शहरात येऊन विचारू लागले. 2“कि तो बाळ कुठसा हाय जो यहुदी लोकायचा राजा बनण्यासाठी जन्मला हाय? कावून कि आमी पूर्वे दिशेस त्याचा जन्माचा तारा पावून त्याले नमन कऱ्याले आलो हावो.”
3यहुदियाचा राजाच्या जन्माच्या बाऱ्यात आयकून हेरोद राजा अन् त्याच्या सोबत यरुशलेम शहरातले लय लोकं घाबरून गेले होते. 4अन् त्यानं लोकायच्या सर्व मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायले जमा करून त्यायले विचारलं, कि पवित्रशास्त्रात लिवलेल्या प्रमाणे “ख्रिस्ताचा#2:4 ख्रिस्ताचा ख्रिस्ताचा अर्थ देवाचा निवडलेला तारणारा जन्म कुठसा व्हायला पायजे?” 5तवा त्यायनं त्याले म्हतलं कि, “ख्रिस्ताचा जन्म या यहुदीया प्रांताच्या बेथलहेम गावात होईन,” कावून कि भविष्यवक्ता मिकाने बऱ्याचं वर्षा पयले असं लिवलेल हाय जे देवानं म्हतलं होतं.
6“हे यहुदाच्या प्रांतातल्या बेथलहेम गावातल्या लोकायनो तुमी कोण्याही रीतीने यहुदा प्रांताच्या अधिकाऱ्याहून लहान नाई, तुमच्यातून एक माणूस येईन, जो शासक बनीन, जो माह्या इस्राएल देशाच्या प्रजेले संभाळीन.” 7तवा हेरोद राजाने त्या जन्मलेल्या बाळाचे वय माईत कऱ्यासाठी असं केलं कि, त्यानं ज्योतिषी लोकायले गुप्तपणे बलाऊन त्यायले विचारू लागला, कि तारा ठिक कोणत्या वाक्ती दिसून आला होता. 8अन् त्यानं हे सांगून ज्योतीष्यायले बेथलहेम गावात पाठवलं, “कि जाऊन त्या बाळाच्या बद्दल ठिक-ठिक माईती विचारपूस करा, अन् जवा तुमी त्याले शोधाल तवा मले येऊन कळवा म्हणजे मी हि त्याले येऊन नमन करीन.”
9ते राज्याचे सांगण आयकून चालले गेले, अन् रस्त्यात तोच तारा पायला जो त्यायनं पूर्व दिशेत पायला होता, जवा त्यायन पायलं, तवा ते लय आनंदित झाले. हा तारा त्यायच्या समोर-समोर जात होता, जोपर्यंत तो तारा त्या जागे पर्यंत नाई थांबला जती बाळ होता. 10अन् तो तारा पाऊन त्यायले लय मोठा आनंद झाला.
11अन् त्या घरात जाऊन त्यायन त्या बाळाले त्याच्यावाल्या माय मरियाच्या पासी पायलं, अन् खाली झुकून त्याले नमन केलं. अन् आपली-आपली थयली खोलून, त्याले सोनं, अन् सुगंधित लोबान जे लय किंमतीवान होतं, अन् गंधरस हे भेट देली. 12अन् त्यायन वापस हेरोद राजापासी नाई जावं, अशी स्वप्नात सूचना झाल्याच्यान त्यायन राजाले सूचना नाई देली, अन् दुसऱ्या रस्त्याने आपल्या देशात वापस चालले गेले.
मिस्र देशात निघून जाणे
13मंग ते गेल्यावर देवाचा एका देवदूतान योसेफाच्या सपनात येऊन म्हतलं, “कि उठ अन् त्या बाळाले अन् त्याच्यावाल्या मायले घेऊन मिस्र देशात पऊन जाय, अन् जोपर्यंत मी तुले म्हणत नाई तत पर्यंत ततीसाच रायजो, कावून कि या बाळाले माऱ्याले हेरोद राजा पाऊन रायला हाय.”
14तवा तो रात्रीचं उठून लेकराला अन् त्याच्यावाल्या मायले घेऊन मिस्र देशात निघून गेला. 15अन् हेरोद राजा मरेपरेंत ते मिस्र देशातच रायले, ह्याच्यासाठी कि, जे वचन देवानं भविष्यवक्ता होसेच्या इकडून लय पयले म्हतलं होतं, ते पूर्ण व्हावं, “मी आपल्या पोराले मिस्र देशातून बलावलं”
हेरोद राज्याच्या इकून लहान लेकरायले मारून टाकणं
16राजा हेरोद रागानं भरला, जवा त्याले हे माईत झालं, कि ज्योतिषी लोकायन आपल्याले फसवलं हाय, हे पाऊन हेरोद राजानं आपल्या सैनिकायले पाठवलं, कि जाऊन बेथलहेम गावात अन् त्याच्या आजूबाजूच्या सर्व पोरायले मारून टाका, जे दोन वर्षाचे अन् त्याच्याऊन कमी वयाचे होते. हे ज्योतिषी कडून ताऱ्याले सर्वात पयल्या वेळा दिसल्याच्या विवर्णावर आधारित होतं.
17तवा जे वचन यिर्मया भविष्यवक्त्याच्या व्दारे देवानं जे पवित्रशास्त्रात सांगतले होते, ते पूर्ण झाले 18लोकायनो “रामा नगरात कोणाची तरी रडण्याचा आवाज आयकू आला, राहेल आपल्या लेकरायसाठी दुख करत होती, अन् शांत होतं नव्हती, कावून कि ते मेले होते.”
मिस्र देशातून वापस येणं
19-20मंग पाहा, हेरोद राजा मेल्यावर देवाच्या देवदूतान मिस्र देशात योसेफले सपनात येऊन म्हतलं, “कि उठ, बाळाले अन् त्याच्यावाल्या मायले घेऊन इस्राएल देशात चालला जा, कावून कि राजा हेरोद अन् त्याचे लोकं, जे बाळाले जीवाने माऱ्यासाठी पायत होते ते मेले हायत.” 21अन् तवा तो उठला अन् त्या बाळाले व त्याच्या मायले संग घेऊन मिस्र देशाले सोळून इस्राएल देशात निघून गेले.
22पण जवा योसेफन आयकलं, कि अरखीलाउस आपला बाप हेरोद राजाच्या जागी यहुदीया प्रांतावर राज्य करत हाय, म्हणून तती जायाले भेला, अन् सपनात देवापासून त्याले चेतावणी भेटली, तवा तो गालील प्रांतात निघून गेला. 23अन् तो नासरेतनावाच्या नगरात जाऊन रायला, कावून कि देवाचं ते वचन पूर्ण व्हावं, जे भविष्यवक्त्यायच्या व्दारे येशूच्या बाऱ्यात सांगतल होते, कि “त्याले नासरत नगरातला म्हतल्या जाईन.”

ハイライト

シェア

コピー

None

すべてのデバイスで、ハイライト箇所を保存したいですか? サインアップまたはサインインしてください。