उत्पत्ती 10
10
सर्व देशांचे पत्रक
1नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.
याफेथ
2याफेथाचे पुत्र:
गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
3गोमेरचे पुत्र:
आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.
4यावानाचे पुत्र:
एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. 5या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.
हाम
6हामाचे पुत्र:
कूश, इजिप्त, पूट व कनान.
7कूशाचे पुत्र:
सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका.
रामाहचे पुत्र:
शबा व ददान.
8कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला. 9तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती. 10शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती. 11शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह,#10:11 किंवा शहराच्या नाक्यासहित रेहोबोथ ईर व कालह 12व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
13इजिप्तचे पुत्र:
लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, 14पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.
15कनान यांचा पिता होता:
प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ, 16यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17हिव्वी, आर्की, सीनी 18अर्वादी, समारी व हमाथी.
(नंतर कनानी वंशज विखुरले 19आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
20वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
शेम
21याफेथचा#10:21 किंवा चा थोरला बंधू धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
22शेमचे पुत्र:
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
23अरामाचे पुत्र:
ऊस, हूल, गेतेर व मेशेख.#10:23 किंवा माश
24अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला
व शेलाह एबरचा पिता झाला.
25एबरला दोन पुत्र झाले:
एकाचे नाव पेलेग#10:25 पेलेग अर्थात् विभाजन ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.
26योक्तानचे पुत्र:
अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 27हदोराम, ऊजाल, दिक्लाह, 28ओबाल, अबीमाएल, शबा, 29ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
30(ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)
31कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते.
32वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली.
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.