1
योहान 15:5
मराठी समकालीन आवृत्ती
“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.
Համեմատել
Ուսումնասիրեք योहान 15:5
2
योहान 15:4
म्हणून मजमध्ये राहा, व मी तुम्हामध्ये राहीन. कारण कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.
Ուսումնասիրեք योहान 15:4
3
योहान 15:7
परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.
Ուսումնասիրեք योहान 15:7
4
योहान 15:16
तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली, ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे.
Ուսումնասիրեք योहान 15:16
5
योहान 15:13
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
Ուսումնասիրեք योहान 15:13
6
योहान 15:2
माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती तो छाटून टाकतो आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून तो तिची छाटणी करतो.
Ուսումնասիրեք योहान 15:2
7
योहान 15:12
माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
Ուսումնասիրեք योहान 15:12
8
योहान 15:8
तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी होईल.
Ուսումնասիրեք योहान 15:8
9
योहान 15:1
“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
Ուսումնասիրեք योहान 15:1
10
योहान 15:6
जो कोणी माझ्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्या फांदीसारखे आहात, जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून, आगीत टाकून जाळतात.
Ուսումնասիրեք योहान 15:6
11
योहान 15:11
मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
Ուսումնասիրեք योहान 15:11
12
योहान 15:10
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, तसे जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल.
Ուսումնասիրեք योहान 15:10
13
योहान 15:17
ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
Ուսումնասիրեք योहान 15:17
14
योहान 15:19
जर तुम्ही जगाचे असता, तर स्वतःवर करावी अशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही जगाचे नाही, या जगातून मी तुमची निवड केली आहे आणि त्या कारणाने जग तुमचा द्वेष करते.
Ուսումնասիրեք योहान 15:19
Գլխավոր
Աստվածաշունչ
Ծրագրեր
Տեսանյութեր