1
लूक 13:24
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.
Համեմատել
Ուսումնասիրեք लूक 13:24
2
लूक 13:11-12
तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
Ուսումնասիրեք लूक 13:11-12
3
लूक 13:13
त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
Ուսումնասիրեք लूक 13:13
4
लूक 13:30
आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.”
Ուսումնասիրեք लूक 13:30
5
लूक 13:25
घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’
Ուսումնասիրեք लूक 13:25
6
लूक 13:5
मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
Ուսումնասիրեք लूक 13:5
7
लूक 13:27
परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’
Ուսումնասիրեք लूक 13:27
8
लूक 13:18-19
ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले; आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांत राहू लागली.”
Ուսումնասիրեք लूक 13:18-19
Գլխավոր
Աստվածաշունչ
Ծրագրեր
Տեսանյութեր