मत्तय 15

15
परंपरा प्रमाणे चालाना प्रश्न
(मार्क 7:1-13)
1एक दिन काही परूशी लोक आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु कळे ईसन सांगू लागनात. 2तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या गंधा हात वर जेवण काब करतस? 3तेनी तेस्ले उत्तर दिसन सांग, तुमी परमेश्वर ना नियमले अस्वीकार करी देतस, कारण तुमी कामस्ले आपली रीतीरिवाज वर करी साकोत. 4कारण कि परमेश्वर नि सांगेल शे, “कि आपला बाप आणि आपली माय ना आदर कर,” आणि “कोणी आपला बाप व माय ले वाईट सांगस तो निश्चित मारी टाकाय जाईन.” 5पण तुमी सांगतस कि कोणी आपला बाप व माय ले सांगस, मी तुमनी मदत नई करू सकत कारण जे मी तुमले देतु ते मनी परमेश्वर ले देवानी शेप्पत खायेल शे. एनासाठे हई भेट फक्त परमेश्वर साठे शे. 6आणि मंग तव पासून, तुमी त्या माणुस ले तेनी माय व बाप नि मदत करानी परवानगी नई देतस. या प्रकारे, तुमी परमेश्वर ना पुस्तक ना पालन नई करतस, जी तेनी तुमले दियेल शे, पण त्या रीतीरिवाज ना पालन करतस ज्या तुमना आजोबास्ना द्वारे सोपेल शे. 7ओ कपटी, यशया नि परमेश्वर ना पुस्तक मा जी भविष्यवाणी करी, 8“ती तुमना सारखा ढोंगीस्ना बारामा खरी शे. तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस.#15:8 तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस. हई वचन यशया 29:13 मधून लीयेल शे. 9आणि त्या व्यर्थ मनी उपासना करतस कारण कि लोकस्ना विधी ले निरर्थक करीसन शिकाळस.”
अशुद्ध करणारी गोष्टी
(मार्क 7:14-23)
10परत येशु लोकस्ले आपला जोळे बलाईसन तेस्ले सांग, ध्यान द्या आणि समजाना प्रयत्न करा कि मी काय सांगस. 11जे तोंड मा जास ते माणुस्ले अशुद्ध नई करस पण जे तोंड मधून निघस ते माणुस्ले अशुद्ध करस. 12तव शिष्यस्नी ईसन तेले सांगणात, “काय तुले माहित शे कि हय आयकीसनच परूशी लोक नारज हुई जायेल होतात?” 13तेनी उत्तर दिधा रोज रोप जो मना स्वर्गीय बाप नि नई लाव उखाडामा येवो. 14तेस्ले जावूद्या त्या आंधळा मार्गदर्शक शे आणि जर आंधळा-आंधळा ले रस्ता दाखाडीन त त्या दोनी खड्डा मा पळतीन.
15हई आयकीसन पेत्र नि सांग हवू दाखला आमले समजाळी दे. 16काय तुमी बी असा अग्यानी शेतस का? 17काय तुमले माहित नई कि जे काही तोंड मा जास ते पोट मा पडस आणि संडास मधून निघी जास. 18पण जे काही लोक विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. 19कारण वाईट विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, हत्या, व्यभिचार, खोटी साक्षी देणे आणि निंदा मन मधूनच निघस. 20हई जे तुमले परमेश्वर पुळे अस्वीकार्य बनावस पण हात नई धुविसन जेवण कराना माणुस्ले अशुद्ध नई करत.
कनानी जात नि बाई ना विश्वास
(मार्क 7:24-30)
21येशु तठून निघीसन सोर आणि सिदोन नाव ना शहर कळे चालना ग्या. 22त्या प्रदेश मधून एक कनानी बाई उणी आणि बोमलीसन सांगू लागणी हे प्रभु दाविद नि संतान मनावर दया कर मनी पोर ले एक दुष्ट आत्मा गैरा त्रास दि ऱ्हायना शे. 23पण तेनी तिले काही उत्तर नई दिध तव शिष्य ईसन तेले विनंती करत ती आमना मांगे इरायनी. 24येशु नि उत्तर दिधा, इस्त्राएल देश ना घराणा ना दवळेल मेंढ्या ले सोळीसन मी कोणाच कळे धाळेल नई शे. 25पण ती उणी आणि येशु ले प्रणाम करीसन सांगू लागणी, हे प्रभु मनी मदत कर. 26तेनी उत्तर दिध, पोरस समोरून भाकर लिसन कुत्रास समोर फेकान हई चांगल नई शे. 27तेनी सांग खर शे प्रभु पण कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस. 28एनावर येशु नि तेले उत्तर दिधा हे बाई तुना विश्वास मोठा शे तुनी ईच्छा शे तुना साठे तसच होवो आणि तेनी पोरगी त्याच क्षण चांगली हुयनी.
गैरा रोगीस्ले चांगल करन
29येशु तठून गालील ना समुद्र ना जोडे उना आणि डोंगरावर चळीसन बठी ग्या. 30तव गर्दी वर गर्दी तेन कळे उणी, त्या आपला संगे लंगडा आंधळा गुंगा दुन्डा आणि गैरास्ले तेना जोडे लयनात, आणि तेस्नी येशु ना पाय मा बसाळ. 31जव लोकस्नी देख कि गुंगा बोलतस आणि टुंडा चांगला होतस लंगडा चालतस आणि आंधळा देखतस चकित हुईसन इस्त्राएल देश परमेश्वर नि महिमा कराले लागनात.
चार हजार लोकस्ले खावाळ
(मार्क 8:1-10)
32येशु नि तेना शिष्यस्ले जोळे बलायसन तेस्ले सांग, या मुळे मले तेस्ना साठे गैरा दुख हुई ऱ्हायना शे, कारण कि त्या ह्या लोक पयलेच तीन दिन पासून मना संगे शेतस. आणि आते तेस्ना जोळे खावाले काय बी नई होत. जर मी एस्ले जेवण खावाळा बिगर भुक्या घर धाळी दिसू, त त्या रस्ता मा थकीसन पळी जातीन. 33शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “कोणी बी या सर्वा लोकस्ले तृप्त करासाठे या सुनसान जागा वर पोट भर जेवण नई झामलू सकस.” 34येशु नि तेस्ले विचार, “तुमना जोळे कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी सांग, “सात भाकरी.” आणि थोळा धाकला मासा शे. 35मंग येशु नि लोकस्ले जमीन वर बसानी आदन्या दिधी. 36आणि नंतर त्या सात भाकऱ्या लीधा, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिधा भाकर ले मोळना, आणि तेनी आपला शिष्यस्ले दिधा आणि तेस्नी लोकस्ले. 37लोक खायीसन तृप्त हुई ग्यात, आणि शिष्यस्नी सात मोठ्या टोपल्या भरीसन उरेल तुकळास्ले एकत्र करणात. 38खाणारा बाया आणि पोरस्ले सोळीसन चार हजार माणस होतात. 39तव येशु गर्दी ले धाळीसन नाव वर चळी ग्या, आणि मगदन क्षेत्र#15:39 मगदन क्षेत्र मार्क 8:10, दल्मुथा नाव ना प्रयोग करेल शे ती जागाच एक शे. मा उना.

Chwazi Kounye ya:

मत्तय 15: AHRNT

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte