मत्तय 14

14
बाप्तिस्मा करनारा योहानना वध
(मार्क ६:१४-२९; लूक ९:७-९)
1त्या दिनसमा हेरोद राजानी येशुबद्दल ऐकं; 2अनी आपला सेवकसले सांगं, हाऊ बाप्तिस्मा करनारा योहान शे; हाऊ मरेल मातीन ऊठेल शे म्हणीन या चमत्कार त्यानामा व्हई राहिनात. 3#लूक ३:१९,२०कारण हेरोदनी आपला भाऊ फिलीप्प यानी बायको हेरोदीया हिनामुये बाप्तिस्मा करनारा योहानले धरीसन अनं बांधीन कैदखानामा टाकेल व्हतं; 4कारण योहान त्याले सांगे, की, तु तिले ठेवावं हाई तुनाकरता योग्य नही; 5अनी हेरोद राजा त्याले मारा करता दखे पण लोकसनी त्याले भिती वाटे कारण लोके योहानले संदेष्टा समजेत. 6नंतर हेरोदना जन्मदिन वना तवय हेरोदियानी पोरनी दरबारमा नाचगाणा करीसन हेरोदले खूश करं. 7म्हणीन त्यानी तिले शपथ वाहिसन वचन दिधं की, जे काही तु मनापाशी मांगशी ते मी तुले दिसु. 8मंग तिले मायनी शिकाडेल प्रमाणे तिनी सांगं, बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं ताटमा ठेईसन माले आठे आणी द्या. 9तवय राजाले खुप वाईट वाटनं; तरी आपली देयल शपथमुये अनी ज्या पंक्तिस्मा बठेल व्हतात त्यासनामुये त्यानी ते देवानी आज्ञा करी. 10तवय त्यानी माणसं धाडीसन कैदखानामा योहानना वध करा. 11मंग त्याना मुंडकं ताटमा ठेईसन पोरले आणी दिधं अनी तिनी ते आपली मायनाजोडे आणं. 12मंग त्याना शिष्यसनी ईसन त्यानं प्रेत उचलीन आणं अनं त्याले पुरी टाकं; अनी जाईसन येशुले हाई बातमी दिधी.
पाच हजारसले जेवण
(मार्क ६:३०-४४; लूक ९:१०-१७; योहान ६:१-१४)
13हाई ऐकीसन येशु तठेन नावमा बशीन निंघना अनी एकांतमा गया; हाई ऐकीसन लोकसनी गर्दी नगरमातीन त्यानामांगे पायीपायी गयी. 14मंग त्यानी बाहेर ईसन लोकसनी गर्दी दखी; तवय त्याले त्यासनी किव वनी अनं त्यासनामा बराच रोगीसले त्यानी बरं करं. 15मंग संध्याकाय व्हवावर त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, हाई एकांतनी जागा शे अनं येळ व्हई जायेल शे; तर लोकसनी गावमा जाईसन स्वतःकरता खावाले अन्न ईकत लई येवाले पाहिजे म्हणीसन त्यासले निरोप द्या. 16येशु त्यासले बोलना, लोकसले जावानी गरज नही; तुम्हीनच त्यासले खावाले द्या. 17त्या त्याले बोलनात, आमनाजोडे फक्त पाच भाकरी अनं दोन मासा शेतस. 18येशुनी सांगं, ते ईकडं मनाजोडे आणा. 19मंग येशुनी लोकसनी गर्दीले गवतमा बसानी आज्ञा करी अनी त्या पाच भाकरी अनं दोन मासा लिसन त्यानी वर आकाशमा दखीन आशिर्वाद मांगा अनी भाकरी मोडीसन शिष्यसकडे दिध्यात अनं शिष्यसनी त्या लोकसले वाढी दिध्यात. 20मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हईनात; अनी उरेल तुकडासना बारा टोपला त्यासनी भरी लिध्यात. 21खाणारा सर्वा पाच हजार माणसं व्हतात; अनी बाया अनं पोऱ्या या अजुन निराळाच व्हतात.
येशु समुद्रवरतीन चालस
(मार्क ६:४५-५२; योहान ६:१५-२१)
22नंतर, मी लोकसनी गर्दीले निरोप दिसन येस तोपावत तुम्हीन नावमा बशीन मनापुढे दुसरी बाजुले जा, अस म्हणीसन येशुनी शिष्यसले लगेच धाडी दिधं. 23मंग लोकसले निरोप देवावर तो प्रार्थना कराले डोंगरवर एकलाच गया अनी रात व्हवावर पण येशु तठे एकलाच व्हता. 24ईकडं वारा तोंडना दिशातीन ऱ्हावामुये किनारापाईन बराच अंतरमा नाव समुद्रना मधला भागमा लाटासघाई हैराण व्हई जायेल व्हती. 25तवय पहाटले तीन ते सव वाजाना दरम्यान येशु समुद्रवरतीन चालत त्यासनाजोडे वना. 26शिष्य त्याले समुद्रवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनं त्या भ्याईसन वरडनात; हाई भूत शे. 27पण येशु त्यासले लगेच बोलना, धीर धरा मी शे; घाबरू नका. 28तवय पेत्रनी उत्तर दिधं, प्रभुजी, जर तुम्हीन शेतस तर पाणीवरतीन तुमना जोडे येवाले माले सांगा.
29त्यानी सांगं, ये; तवय पेत्र येशुकडे जावाकरता नावमाईन उतरीसन चालाले लागना; 30पण वारा दखीसन तो भ्याईना अनी बुडाले लागना तवय तो वरडना, प्रभुजी, माले वाचाडा.
31येशुनी लगेच हात पुढं करीसन त्याले धरं अनं बोलना, अरे अल्पईश्वासी तु शंका कशाले धरी?
32मंग त्या नावमा चढनात तवय वारा बंद पडना. 33तवय ज्या नावमा व्हतात त्या सर्वा त्याना पाया पडीसन बोलनात, तुम्हीन खरोखर देवना पोऱ्या शेतस.
येशु गनेसरेत गावमा रोगीसले बरं करस
(मार्क ६:५३-५६)
34नंतर त्या दुसरा बाजुले जाईसन गनेसरेत प्रांतमा गयात; 35अनी तठला लोकसनी त्याले वळखीन आपला आसपासना सर्वा नगरमा माणसं धाडीसन आजारी लोकसले त्यानाकडे आणं. 36अनी फक्त तुमना कपडासले आमले हात लावु द्या, अशी त्यासनी त्याले ईनंती करी; तवय जितलासनी त्याले हात लावा तितला सर्वा बरा व्हईनात.

હાલમાં પસંદ કરેલ:

मत्तय 14: NTAii20

Highlight

શેર કરો

નકલ કરો

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in