मत्तय 1

1
येशू ख्रिस्ताची वंशावळी
1अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची#1:1 ख्रिस्त अर्थ अभिषिक्त ही वंशावळी:
2अब्राहाम इसहाकाचा पिता होता,
इसहाक याकोबाचा पिता,
याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता,
3यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती.
पेरेस हेस्रोनचा पिता,
हेस्रोन अरामचा पिता,
4अराम अम्मीनादाबाचा पिता,
अम्मीनादाब नहशोनाचा पिता,
नहशोन हा सल्मोनाचा पिता,
5सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती,
बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती,
ओबेद इशायाचा पिता,
6इशाय दावीद राजाचा पिता,
दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,
7शलोमोन रहबामाचा पिता,
रहबाम अबीयाचा पिता,
अबीया आसाचा पिता,
8आसा यहोशाफाटाचा पिता,
यहोशाफाट योरामाचा पिता,
योराम उज्जीयाहचा पिता,
9उज्जीयाह योथामाचा पिता,
योथाम आहाजाचा पिता,
आहाज हिज्कीयाचा पिता,
10हिज्कीयाह मनश्शेहचा पिता,
मनश्शेह आमोनाचा पिता,
आमोन योशीयाहचा,
11योशीयाह यखन्या#1:11 यखन्या किंवा यहोयाखीन व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.
12बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर:
यखन्या शल्तीएलचा पिता,
शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,
13जरूब्बाबेल अबीहूदचा पिता,
अबीहूद एल्याकीमचा पिता,
एल्याकीम अज्जूरचा पिता,
14अज्जूर सादोकाचा पिता,
सादोक याखीमचा पिता,
याखीम एलीहूदाचा पिता,
15एलीहूद एलअज़ाराचा पिता,
एलअज़ार मत्तानाचा पिता,
मत्तान याकोबाचा पिता,
16याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.
17अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
योसेफ येशूंना स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकारतो
18येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा िववाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. 19तिचा पती योसेफ हा नीतिमान#1:19 किंवा नियमांशी विश्वासू होता होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.
20परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. 21ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू#1:21 येशू हिब्री भाषेत यहोशुआ अर्थ याहवेह जे तारण करतात ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
22प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. 23“कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
24योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले. 25तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.

Tällä hetkellä valittuna:

मत्तय 1: MRCV

Korostus

Jaa

Kopioi

None

Haluatko, että korostuksesi tallennetaan kaikille laitteillesi? Rekisteröidy tai kirjaudu sisään