1
लूक 13:24
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत.
مقایسه
लूक 13:24 را جستجو کنید
2
लूक 13:11-12
तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
लूक 13:11-12 را جستجو کنید
3
लूक 13:13
त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.
लूक 13:13 را جستجو کنید
4
लूक 13:30
खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
लूक 13:30 را جستجو کنید
5
लूक 13:25
एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’ “तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’
लूक 13:25 را جستجو کنید
6
लूक 13:5
नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”
लूक 13:5 را جستجو کنید
7
लूक 13:27
“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’
लूक 13:27 را جستجو کنید
8
लूक 13:18-19
नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? एका मनुष्याने आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.”
लूक 13:18-19 را جستجو کنید
خانه
كتابمقدس
برنامههای مطالعه
ویدیوها