YouVersion Logo
Search Icon

मत्तय 7

7
दोष लावू नका
(लूका 6:37-38,41-42)
1“दोष नका लावू, म्हणजे तुमच्यावर पण दोष लावला जाणार नाई. 2कावून कि ज्याप्रकारे तुमी दुसऱ्यावर दोष लावता, त्याचं प्रकारे तुमच्यावर पण दोष लावला जाईन. अन् ज्याप्रकारे तुमी दुसऱ्याचा न्याय करसान तसाच तुमचा पण न्याय केला जाईन.”
3“तू कावून आपल्या भावाच्या लहान-लहान चुका पायतो, आपल्या सोताच्या मोठ्या-मोठ्या चुका तुले दिसत नाई काय? 4जवा तुह्याल्या जीवनात एवढ्या मोठ्या चुका हाय, तवा तू आपल्या भावाच्या जीवनात एवढे मोठे दोष कायले लावते, अन् म्हणते कि ये मी तुह्याल्या चुका दूर करून तुह्याली मदत करतो. 5हे कपटी पयले आपल्या जीवनातले चुका दूर कर, तवा तू आपल्या भावाच्या जीवनातल्या चुका मोठ्या हक्कान दूर करशीन.”
6“देवाचा संदेश त्या लोकायले सांगू नका जे त्याले आयकतं नाई, अन् जर तुमी असं करता तर असं होईन जसे कोणी पवित्र वस्तुले कुत्र्याच्या समोर फेकून देते किंवा जसं डुकराच्या समोर मोती फेकणे, जे फक्त त्याले ठेचून काढतीन अन् मंग तुमच्यावर हल्ला करतीन.”
देवाले मांगन अन् भेटन
(लूका 11:9-13)
7“तुमाले जे पायजे ते देवाले मांगा अन् तो तुमाले देईन. शोधान तर तुमाले सापडेल, ठोकसान तर तुमच्यासाठी उघडल्या जाईन. 8कावून कि जो कोणी मांगते त्याले मिळेल, अन् जो कोणी शोधते त्याले सापडते, अन् जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईन.”
9“तुमच्याईत असा कोणता माणूस हाय, जर त्याच्यावाला पोरगा, त्याले भाकर मांगीण तर तो त्याले दगड देईन? 10अशाचं प्रकाराने जर त्याचा पोरगा मासोई मांगणार तर तो त्याऐवजी सर्प देईन? 11जर तुमी बेकार असूनहि तुमी तुमच्या लेकरायले चांगली वस्तु देता, तवा तुमच्या स्वर्गातला देवबाप आपल्या मांगणाऱ्यायले चांगली वस्तु नक्की देईन.
12प्रत्येक वेळी दुसऱ्या कडून जसं तुमी आपल्यासाठी चांगल्या व्यवहाराची अपेक्षा ठेवता तसचं तुमी पण त्यायच्या सोबत तसाच व्यवहार करत जा, कावून कि मोशेचे नियमशास्त्र अन् भविष्यवक्त्यायची शिकवणूक हेच हाय.”
सोपा अन् कठीण रस्ता
(लूका 13:24)
13“तुमी फक्त कठीण व अरुंद दरवाज्यान प्रवेश करूनच देवाच्या राज्यात जाऊ शकता, कावून कि नरकात जाणारा दरवाजा मोठा हाय, अन् तिकडे जाणारा रस्ता सरळ हाय, अन् त्यातून जाणारे लोकं लय हायत. 14कावून कि कठीण व रुंद हाय, तो दरवाजा जो कधी न संपनाऱ्या जीवनाकडे पोहचते, थोडेचं लोकं हायत जे त्याले प्राप्त करतात.”
फळापासून झाडाची ओयख
(लूका 6:43-44; 13:25-27)
15“खोट्या भविष्यवक्त्यायपासून सावध राहा, जे लांडग्या सारखे हायत, ज्यायनं सोताले मेंढरायच्या कातडीनं लपवलं हाय, लोकायले हे विश्वास द्याले कि ते मेंढरं हायत, पण ते आखरी कुर लांडगे असतात जे लोकायवर हल्ला करते. 16कावून ज्याप्रकारे ते जीवन जगतात त्याच्याच्यान त्यायले तुमी ओयखसान, काय लोकं झुडपा पासून अंगुर या काटेरी झाडापासून अंजीर तोडतात? 17अशाचं प्रकारे हरएक चांगलं झाड, चांगलं फळ आणते, अन् बेकार झाड बेकार फळ आणते.
18चांगलं झाड बेकार फळ देऊ शकत नाई, अन् बेकार झाड चांगलं फळ देऊ शकत नाई. 19जे-जे झाड चांगलं फळ देत नाई ते कापलं जाईन अन् आगीत फेकल जाईन; खोट्या भविष्यवक्त्यायले पण अशाचं प्रकारे दंड देल्या जाईन. 20अशाप्रकारे तुमी त्यायच्या कामामुळे त्यायले ओयखसान 21जो मले हे प्रभू हे प्रभू म्हणतो, त्याच्यातून प्रत्येक जन देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाई, पण तोच जो स्वर्गीय देवबापाच्या इच्छावर चलते तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करीन.
22न्यायाच्या दिवशी बरेचं लोकं मले म्हणतीन, हे प्रभू, हे प्रभू, आमी तर तुह्याल्या नावाने भविष्यवाणी केली, अन् तुह्याल्या नावाने भुत आत्मा काढले, अन् तुह्यावाल्या नावाने लय चमत्काराचे काम केले हायत. 23तवा मी त्यायले उघडपणे म्हणीन, मी तुमाले ओयखत नाई, अन् हे अधर्मी काम करणाऱ्यानो माह्याल्या पासून निघून जा.”
बुद्धीमान अन् निर्बुद्धी माणूस
(लूका 6:47-49)
24“म्हणून जो कोणी माह्याली गोष्ट आयकून मानते, तो त्या बुद्धीमान माणसा सारखा हाय, ज्यानं आपल्या घराचा पाया गोट्याच्या टेकडीवर बांधला हाय. 25अन् पाऊस पडला, अन् पुर आला वारेही सुटले अन् त्या घराले लागले, तरी ते घर पडले नाई कावून कि त्याच्या पाया गोट्यावर होता.
26पण जो कोणी माह्याली गोष्ट आयकते पण त्यावर नाई चालत, तो त्या निर्बुद्धी माणसा सारखा हाय, ज्यानं आपलं घर रेतीवर बांधलं हाय, 27अन् पाऊस पडला, अन् पुर आले, वारेही सुटले, अन् त्या घराला लागले, अन् ते पडून पूर्ण सत्यानाश झाले.”
28जवा येशूनं ह्या गोष्टी सांगतल्या, तवा असं झालं कि लोकायची गर्दी येशूच्या शिकवण्यानं हापचक झाली. 29कावून कि तो त्यायले मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षका सारखं नाई पण अधिकाऱ्या सारखं शिकवून रायला होता.

Currently Selected:

मत्तय 7: VAHNT

Tõsta esile

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in