Λογότυπο YouVersion
Εικονίδιο αναζήτησης

मत्तय 10

10
बारा प्रेषितायचे नाव
(मार्क 3:13-19; 6:7-13; लूका 6:12-16; 9:1-6)
1मंग येशूनं आपल्या बारा शिष्यायले आपल्यापासी बलावलं अन् त्यायले त्यानं भुत आत्म्यावर अधिकार देला, कि त्यायले लोकायच्या अंदरून बायर काढण्यासाठी, अन् सर्व्या प्रकारच्या बिमार लोकायले त्यायच्या बिमारी अन् दुखणे बरे करण्याच्या अधिकार देला.
2अन् त्या बारा प्रेषितायचे नाव हे हायत, पयला शिमोन, जो पतरस म्हणल्या जाते, अन् त्याच्यावाला भाऊ आंद्रियास, अन् जब्दीचा पोरगा याकोब अन् त्याच्यावाला भाऊ योहान; 3फिलिप्पुस, अन् बरत्तूल्मे, थोमा अन् करवसुली करणारा मत्तय, हल्फईचा पोरगा याकोब अन् तद्दै . 4शिमोन कनानी#10:4 कनानी कनानी चा अर्थ देशभक्त अन् यहुदा इस्कोरोती ज्यानं वैऱ्याच्या हाती येशूले धरून देलं होतं.
शिष्यायले सेवा कार्यासाठी पाठवणे
5मंग येशूनं आपल्या बारा शिष्यायले हे निर्देश देऊन पाठवलं, कि “अन्यजातीच्या इकळे जाऊ नका, सामरी प्रांताच्या लोकायकडे नका जासान, अन् शोमरोनी जातीच्या लोकायच्या कोणत्याही नगरात नका जासान.” 6पण तुमी इस्राएल जातीच्या लोकायपासी जासान, कावून कि ते हरपलेल्या मेंढराय सारखे हायत ज्यायची कोणी काळजी घेणारे नाही. 7अन् जवा तुमी जासान तवा लोकायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगा, कि देवाचं राज्य लय जवळ आला हाय.
8बिमारायले बरं करा, मेलेल्यायले जिवंत करा, अन् कुष्ठरोग्यायले बरं करा, भुत आत्म्यायले लोकायतून बायर काढा, तुमाले फुकट मिळाले हाय, तुमी पण दुसऱ्यायले फुकट द्या. 9आपल्या बटव्यात सोनं अन् रुपये अन् तांबे घेऊ नका. 10तसचं तुमी आपल्या संग थयली पण नका घेऊ व जास्तीचे कपडे संग नका घेऊ, चप्पल अन् काठी पण नाई कावून कि लोकं तुमाले द्याले पायजे ज्याची तुमाले आवशक्यता हाय. 11येशूनं शिष्यायले म्हतलं, “ज्या कोण्या गावात या नगरात जासान तवा तती एका चांगल्या माणसाले शोधान अन् त्याचं माणसाच्या घरी रायजा जवा पर्यंत तुमी त्या गावाले सोडत नाई.
12अन् घरात गेल्यावर त्या घरच्या लोकायले आशीर्वाद देजा. 13जर त्या घरचे लोकं तुमाले स्वीकारतीन तर तुमचं आशीर्वाद त्यायच्यावर जाईन, पण जर ते तुमाले स्वीकार करतीन नाई तर तुमचा आशीर्वाद त्यायच्या पासून वापस येईन. 14जर कोण्यावेळी तुमी कोणत्या घरी किंवा गावात जाता अन् तितल्या लोकायन तुमाले स्वीकारलं नाई अन् तुमचा संदेश नाई आयकतं तर त्या घरून किंवा नगरातून निघण्याच्या वाक्ती आपल्या पायाचा धूळ पण झटकून टाका. 15पण मी तुमाले सांगतो, ज्या दिवशी देव न्याय करीन तवा तुमची दशा सदोम अन् गमोरा शहरापेक्षा पण भयंकर होईन.”
येणारी कठीण वेळ
(मार्क 13:9-13; लूका 21:12-17)
16“पाहा, मी तुमाले अश्या लोकायमध्ये पाठवतो जे तुमाले मारून टाकतीन, अन् तुमी जंगली लांडग्या मधी मेंढरासारखे असान, म्हणून तुमी सर्पाच्या सारखे चतुर अन् कबुतरा सारखे भोले बनून रायजा. 17-18पण लोकायपासून सावध राहा, कावून कि तुमचे वैरी तुमाले न्यायसभेत घेऊन जातीन, अन् धार्मिक सभास्थानात तुमाले दंड देतीन, माह्य अनुसरण केल्यामुळे तुमाले शिपाई राजायच्या अन् राज्यपालच्या समोर उभं करतीन, हे याच्यासाठी होईन कि तुमी अन्यजातीच्या लोकायले देवाचा संदेश द्यावा.
19-20जवा ते तुमाले पकडून अधिकाऱ्याच्या हाती सोपून देतीन, तवा काळजी करू नका, कि आमी काय बोलू, अन् काय म्हणू, पण जे काई तुमाले बोला लागीन ते तुमाले तवा जे काई देवबापाचा आत्मा म्हणीन, तेच बोल्याचं, कारण कि तवा बोलणारे तुमी नाई पण तुमच्या देवबापाचा आत्मा राईन. 21त्यावाक्ती भाऊ आपल्या भावाले अन् बाप आपल्या पोराले जीवे मारण्यासाठी धरून देतीन. लेकरं आपल्या माय बापाच्या विरोधात उठून त्यायले दुसऱ्या लोकायकडून मारून टाकतीन.
22माह्याल्या नावाने सगळे लोकं, तुमचा वैर करतीन कावून कि तुमी माह्यावर विश्वास करता, पण जो आखरी परेंत धीरज धरून राईन, देव त्याचचं तारण करीन. 23जवा ते तुमाले एका नगरात सतावतीन, तवा दुसऱ्या नगरात पडून जासान, मी तुमाले खरं सांगतो, जतपरेंत तुमी इस्राएल देशाच्या सर्व्या नगरातल फिरून देवाची सुवार्था सांगणार, कि मी, माणसाचा पोरगा येऊन जाईन.”
शिष्य होण्याचा अर्थ
24“शिष्य आपल्या गुरु पेक्षा मोठा नाई, अन् नाई दास आपल्या मालका पेक्षा मोठा 25एक शिष्य खुश होते जवा तो आपल्या गुरु सारखा बनते अन् एक दास खुश होते जवा तो आपल्या मालका सारखा बनते. जवा त्यायनं घराच्या मालकाला सैतान म्हतलं, तर त्याच्या घर वाल्यायले सैतान कावून नाई म्हणतीन?”
कोणाले भेऊ नका
(लूका 12:2-7)
26“म्हणून अश्या लोकायले भेऊ नका, कावून कि जे काई लपलेलं हाय ते दिसून येईन अन् त्यायच्या सर्व्या गोष्टी उघळ्या होतीन. 27जे मी तुमाले अंधारात सांगतल ते तुमी लोकायले ऊजीळात सांगा अन् जे मी तुमाले कानात गुप्तपणे सांगतो ते तुमी सर्व्या लोकायले उघडं करून सांगा.
28त्या लोकायले भेऊ नका जे फक्त शरीराले मारू शकते, पण आत्म्याले मारू शकत नाई, पण देवाले भ्या जो आत्म्याले अन् शरीराले दोघायले नरकात नष्ट करू शकते. 29एका पैसा मध्ये दोन चिमण्या इकल्या जाते, तरी पण तुमच्या देवबापाच्या इच्छेच्या शिवाय त्यायच्या मधून एकही जमिनीवर पडू शकत नाई. 30तुमच्या डोक्यावर किती केसं हायत हे पण देवाले माहीत हाय. 31म्हणून भेऊ नका, कावून कि तुमी देवासाठी चिमण्यापेक्षा जास्त मूल्यवान हायत.”
येशूचा स्वीकारणे या अस्वीकार करणे
(लूका 12:8-9; 12:51-53; 14:26-27)
32“जो कोणी मले माणसा समोर माह्ये शिष्य म्हणून स्वीकार करतीन, त्याले मी पण स्वर्गातल्या देवबापाच्या समोर स्वीकार करीन. 33पण जो कोणी माणसा समोर भेऊन, माह्याले शिष्य म्हणून नाकार करीन, त्याले मी पण आपल्या स्वर्गाच्या देवबापाच्या समोर नाकार करीन. 34हे नका समजू कि मी पृथ्वीवर लोकायमध्ये शांती आणाले आलो, पण शांती नाई तर अलग कऱ्याले आलो हाय. 35मी तर आलो हाय कि माणसाले त्याच्या बापापासून अन् पोरीले तिच्या माय पासून अन् सुनेले तिच्या सासू पासून अलग करण्यासाठी आलो हाय.
36अन् तुमच्या घरचेच लोकं तुम्हचे वैरी होतीन. 37जो माणूस आपल्या माय-बापाले माह्याहून अधिक प्रेम करते, तो माह्यावाला शिष्य बन्याच्या योग्य नाई, अन् जो माणूस आपल्या पोराले किंवा पोरीले माह्याहून अधिक प्रीती करते तो पण माह्या योग्य नाई. 38अन् जो कोणी माह्य शिष्य झाल्याने, वधस्तंभाच दुख उचलाले अन् मराले तयार नाई तो पण माह्याला शिष्य बनाच्या, अन् माह्य अनुकरण करायच्या योग्य नाई. 39जो माणूस आपल्या जीवाले वाचवाले पायतो, तो त्याले गमाविन, अन् जो माणूस माह्यासाठी आपल्या जीवाले गमाविन, त्याले कधीही न सरणार जीवन भेटन.”
प्रतिफळ
(मार्क 9:41)
40“जो कोणी तुमाले माह्यावाले शिष्य समजून स्वीकार करतो, तो मले स्वीकार करतो, अन् जो कोणी मले स्वीकार करतो, तो माह्या पाठवण्याऱ्या देवाले स्वीकार करतो. 41जो कोणी माणूस भविष्यवक्त्याले भविष्यवक्ता म्हणून स्वीकार करणार, त्याले भविष्यवक्त्या सारखाच इनाम मिळेल, अन् जो चांगल्या काम करणाऱ्या माणसाले धर्मी समजून स्वीकार करणार त्याले पण चांगल्या माणसासारखाच इनाम भेटन 42जो कोणी या लहानातल्या एकाले माह्याला शिष्य समजून फक्त जो कोणी गिलास भर पाणी पियाले देईन, मी तुमाले खरं सांगतो त्याले त्याचा इनाम भेटीन.”

Επιλέχθηκαν προς το παρόν:

मत्तय 10: VAHNT

Επισημάνσεις

Κοινοποίηση

Αντιγραφή

None

Θέλετε να αποθηκεύονται οι επισημάνσεις σας σε όλες τις συσκευές σας; Εγγραφείτε ή συνδεθείτε