उत्पत्ती 10

10
नोहाच्या मुलांचे वंशज
(१ इति. 1:5-23)
1नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ ह्यांची वंशावळी येणेप्रमाणे : जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले.
2याफेथाचे मुलगे : गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.
3गोमरचे मुलगे : आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा.
4यावानाचे मुलगे : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
5ह्यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्यांपरत्वे निरनिराळे देश वसवले.
6हामाचे मुलगे : कूश, मिस्राईम, पूट व कनान.
7कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.
8कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.
9तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.
10शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.
11त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;
12तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.
13मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
14पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरी हे झाले.
15कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,
16यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
17हिव्वी, आर्की, शीनी,
18अर्वादी, समारी व हमाथी हे झाले; पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला.
19कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.
20कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे.
21शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेथाचा वडील बंधू, ह्यालाही संतती झाली.
22शेमाचे मुलगे : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
23अरामाचे मुलगे : ऊस, हूल, गेतेर व मश.
24अर्पक्षदास शेलह झाला, व शेलहास एबर झाला.
25एबरास दोन मुलगे झाले, एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
26यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
27हदोराम, ऊजाल, दिक्ला,
28ओबाल, अबीमाएल, शबा,
29ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे.
30त्यांची वस्ती मेशापासून पूर्वेकडील डोंगर सफार ह्याकडे जाण्याच्या वाटेवर होती.
31कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही शेमाची संतती आहे.
32पिढ्या व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्नभिन्न राष्ट्रे झाली.

Markierung

Teilen

Kopieren

None

Möchtest du deine gespeicherten Markierungen auf allen deinen Geräten sehen? Erstelle ein kostenloses Konto oder melde dich an.

Video zu उत्पत्ती 10