लूक 19

19
कर लेणारा जक्कय
1येशु यरीहो शहर मा प्रवेश करीसन जाई ऱ्हायंता. 2आणि देखा, जक्कय नाव ना एक माणुस होता जो जकातदारस्ना अधिकारी होता, आणि मालदार होता. 3येशु ले देखानी तेनी ईच्छा होती, कि तो कोणता शे? पण गर्दी मुळे देखू नई सकत होता, कारण कि तो ठेंगणा होता. 4तव तेले देखा साठे तो पुळे पयीसन एक उंबर ना झाळ वर चळी ग्या, कारण कि तो त्याच रस्ता वरून जानार होता. 5जव येशु त्या झाळ जोळे पोहोचना, तो वरे देखीसन तेले सांगणा, “ओ जक्कय फटकामा उतरी ये, कारण कि मले तुना घर मा राहाण अवश्य शे.” 6तो लवकर झाळ वरून खाले उतरणा आणि येशु ले आपला घर लीग्या, आणि खुशी मा तेना स्वागत करना. 7हय देखीसन सर्वा लोक कुरूकुरू करीसन सांगाले लागनात, “तो त एक पापी माणुस ना घर जायेल शे.” 8जक्कय नि खावाना टाईम ले उभा ऱ्हायसन प्रभु येशु ले सांगणा, “प्रभु, देख मी मनी आधी संपत्ती गरीबस्ले देस, आणि कदी मी लोकस्ले तेस्ना करामा लबाळेल अशीन, त मी तेस्ले चार गुणा परत दि टाकसु.” 9तव येशु नि तेले सांग, “आज ह्या घर मा तारण एयेल शे, एनासाठे कि हवू बी अब्राहाम ना खरा पोऱ्या शे. 10कारण कि मी, माणुस ना पोऱ्या कायम ना दंड पासून वाचाळाले आणि तेस्ना तारण कराले एयेल शे.”
दहा मोहर ना दाखला
(मत्तय 25:14-30)
11जव लोक हय आयकी ऱ्हायंतात, तव येशु नि आपली गोष्ट चालू ठेवी आणि तेस्ले एक दाखला सांगा, कारण कि तो यरूशलेम शहर जोळे होता, आणि लोकस्ले वाटण कि परमेश्वर ना राज्य बस चालू होणारच होत. 12त तेनी सांग, एक मालदार माणुस लांब प्रवास ले चालना एनासाठे कि राजपद लिसन परत येवो. 13आणि तेनी आपला दासस मधून दहास्ले बलाईसन दहा मोहर (दहा मूल्यवान शिक्का) दिधात, आणि तेस्ले सांग, मले परत एवा लगून लेन देन करज्यात. 14पण तेना नगर ना राहाणार लोक तेना कण द्वेष करत होतात, आणि हय सांगा साठे कईक संदेषवाहक ले धाळ, कि आमनी ईच्छा नई शे, कि हवू आमना वर राज्य करो. 15जव तो राजपद लिसन परती उना, त अस हुईन कि तेनी आपला दासस्ले जेस्ले रोकडा दियेल होता, आपला जोळे बलाव एनासाठे कि मालूम करो कि तेस्नी लेन देन कण काय कमाव. 16तव पहिला नि ईसन सांग, मालक, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून दहा आखो मोहर कमायेल शेतस. 17तेनी तेले सांग, शाब्बास, चांगला दास, तू गैरा थोळासा मा विश्वासी निघणा आते दहा नगरस्ना अधिकार ठेव. 18दुसरा नि ईसन सांग, स्वामी तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून आखो पाच मोहर कमाएल शे. 19तेनी तेले सांग, कि तू बी पाच नगरस्वर अधिकार ठेव. 20तिसरा नि ईसन सांग, स्वामी देख, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) हय शे, जेले मी कपळा मा बांधी ठीयेल शे. 21कारण कि मी तुले भ्यात होता, एनासाठे कि तू कठोर माणुस शे, जे तुनी नई ठेयेल तेले तू उचली लेस, आणि जे तुनी नई पेरेल, तेले कापस. 22तेनी तेले सांग, ओ दुष्ट दास, मी तुनाच तोंड कण तुले दोषी ठरावस. तू मले वयखत होता कि कठोर माणुस शे, जे मी नई ठेव तेले उचली लेस, आणि जे मी नई पेर, तेले कापस. 23त तुनी मना पैसा सावकार ले काब नई दि दिधा, कि मी ईसन व्याज सम्मध ली लेतू? 24आणि ज्या लोक नजीक उभा होतात, तेनी तेस्ले सांग, ती मोहर (एक मूल्यवान शिक्का) तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा मोहर शेतस, तेले दिटाका. 25तेस्नी तेले सांग, स्वामी, तेना जोळे दहा मोहर त शेतस. 26मी तुमले सांगस, कि जेना कळे शे, तेले आखो देवामा ईन, आणि जेना कळे नई, तेना कळून ते बी जे तेना कळे शे लेवामा ईन. 27पण मना त्या दुश्मनस्ले जेस्नी ईच्छा नई होती, कि मी तेस्ना राजा बनू, तेस्ले आठे लईसन मना समोर मारी टाका.
यरूशलेम मा विजय प्रवेश
(मत्तय 21:1-11; मार्क 11:1-11; योहान 12:12-19)
28ह्या गोष्टी सांगीसन, येशु यरूशलेम शहर कळे आपला शिष्यस संगे पुळे पुळे चालत ग्या. 29जव तो बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता, त तेनी आपला शिष्यस मधून दोन ले हय सांगीसन धाळ. 30कि आपला समोरला गाव मा जा, आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया. 31जर कोणी तुमले विचारीन कि काब सोळी ऱ्हायनात, हय सांगज्यात, कि येशु प्रभु ले एनी गरज शे. 32ज्या धाळायेल होतात, त्या जाईसन जस सांगेल होत, तसच तेस्नी देख. 33जव त्या धाकला शिंगरू ले सोळीऱ्हायंतात, त तेना मालक नि तेस्ले सांग, “ह्या धाकला शिंगरू ले काब सोळतस?” 34तेस्नी सांग, “प्रभु ले एनी गरज शे.” 35तेस्नी त्या शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या. 36जव तो जात होता, त त्या येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारत जात होतात. 37जव येशु यरूशलेम शहर ना जोळे त्या जागा वर उना जठे सळक खाले जैतून डोंगर कळे जात होती. तव शिष्यस्नी नि पुरी मंडळी त्या बठ्ठा सामर्थ्य ना काम मुळे ज्या तेस्नी देखेल होतात, खुश हुईसन मोठा आवाज मा परमेश्वर नि स्तुती कराले लागणी. 38“धन्य शे तो राजा, जो प्रभु ना नाव कण एस, स्वर्ग मा शांती आणि आकाश मा महिमा हो.” 39तव गर्दी मधून काही परूशी लोक तेले सांगाले लागनात, गुरुजी, तुना शिष्यस्ले धमकाव, कि त्या शांत राहोत. 40तव तेनी तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खर सांगस, कि कदी ह्या लोक शांत हुई ग्यात, त दघळ मनी महिमा करासाठे वरळाले चालू करी देतीन.”
यरूशलेम ना साठे दुख
41जव येशु जोळे उना, तो यरूशलेम शहर ले देखीसन रळना 42आणि सांगणा, गैर चांगल होत कि आज तुले शांती ना रस्ता भेटी जाता. पण आते गैरा टाईम हुई जायेल शे, आणि शांती तुना पासून दपी जायेल शे. 43कारण त्या दिन तुनावर येतीन, कि तुना शत्रू तुना चारीस कळे मोर्चा उभा करतीन, आणि तुले घेरतिन आणि चारीस कळून शहर वर हल्ला करतीन. 44तुना शत्रू तुले पूर्णपणे नष्ट करी टाकतीन, (म्हणजे यरूशलेम ले) आणि तुना सर्वा लोकस्ले मारी टाकतीन, आणि तुना दुश्मन पूर्णपणे नगर ले नष्ट करी देतीन, जो दघळ ना बनेल शे. नई सोळावत, कारण कि तुनी ती संधी जव परमेश्वर तुले वाचाळा साठे उना नई वयखना.
मंदिर मधून व्यापारीस्ले भायेर काळामा येन
(मत्तय 21:12-17; मार्क 11:15-19; योहान 2:13-22)
45तव तो परमेश्वर ना मंदिर मा जाईसन ईकनास्ले बाहेर काळाले लागणा. 46आणि तेस्ले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना घर ले प्रार्थना ना घर बोलामा ईन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शेतस.” 47आणि तो दररोज परमेश्वर ना मंदिर मा प्रवचन सांगत होता, आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्ना मुख्य, तेले नाश करानी संधी देखी ऱ्हायंतात. 48पण कोणता उपाय नई काळी सकनात, कि हय कोणत्या प्रकारे करूत, कारण कि सर्वा लोक मोठी ईच्छा कण तेनी आयकत होतात.

Valgt i Øjeblikket:

लूक 19: AHRNT

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind