Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 2

2
ज्योतिषी लोकस्न येन
1जव राजा हेरोद यहूदीया प्रांत वर राज्य करत होता, त येशु ना जन्म त्या प्रांत ना बेथलेहेम नगर मा हुयना, तव पूर्व कळून बुद्धीमान लोक ज्या तारास्ना अभ्यास करतस, यरूशलेम शहर मा ईसन विचारनात. 2तो पोऱ्या कोठे शे जो यहुदी लोकस्ना राजा बनाना साठे जन्म लीयेल शे? कारण कि आमी पूर्व कळे तेना जन्म ना बारामा दाखाळनारा तारा देखनुत, आणि तेले नमन कराले एयेल शेतस. 3यहुदी लोकस्ना राजा ना जन्म ना बारामा आयकीसन, राजा हेरोद घाबरी ग्या, आणि तेना संगे यरूशलेम शहर ना गैरा सावटा लोक घाबरी ग्यात. 4एनासाठे तेनी सर्वा मुख्य यहुदी पुजारी लोकस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले एकत्र करीसन तेस्ले विचार कि “ख्रिस्त #2:4 ख्रिस्त परमेश्वर ना निवाळेल तारणारा. ना जन्म ना बारामा शास्त्र काय सांगस?” 5तेस्नी तेले सांग, ख्रिस्त ना जन्म या यहूदीया प्रांत ना बेथलेहेम नगर मा हुईन, कारण कि भविष्यवक्तास्ना व्दारे अस लिखेल शे.
6“यहूदा प्रांत ना बेथलेहेम नगर ना लोक, तू कोणताही प्रकारे यहूदीया अधिकारीस्मा सर्वास्तून धाकला नई, कारण कि तुना मधून एक माणुस ईन जो शासक बनीन जो मना लोक इस्त्राएल देश ना राखोया बनीन.”
7हेरोद राजा नि त्या जन्म लीयेल पोऱ्या नि वय माहित कराले बुद्धीमान लोकस्ले चोरी कण बलायसन तेस्ले विचार कि तारा ठीक कोणता टाईम वर दिखेल होता. 8आणि तेनी हय सांगीसन बुद्धीमान लोकस्ले बेथलेहेम नगर मा धाळ, कि जाईसन त्या पोऱ्या ना बारामा खर-खर माहिती करा, आणि जव तो भेटी जाईन, त मना जोळे परत या आणि मंग जे काही तुमनी देखेल शेतस, ते मले सांगा, एनासाठे कि मी बी ईसन तेले वाकीसन नमन करू.
9-10आणि म्हणून त्या चालना ग्यात, आणि रस्ता मा तेस्नी तोच तारा देखनात जो तेस्नी पूर्व कळे देखेल होतात. जव तेस्नी तेले देख, तव त्या गैरा खुश हुयनात. हवू तारा तेस्ना पुळे-पुळे चालना जठलोंग कि त्या, त्या जागा वर नई थांबी ग्या जठे बाळ होत. 11तेस्नी घर मा जाईसन त्या बाळ ले तेनी माय मरिया ना संगे देखा, आणि गुळघा टेकीसन तेले नमन कर, आणि आपला आपला थैल्या उघाळीसन तेले सोना आणि त्या प्रकार ना लोबान जेना गोळ सुगंध ऱ्हास आणि हय महाग ऱ्हास आणि गंधरस भेट चळाव. 12आणि परमेश्वर नि तेस्ले स्वप्न मा हय चेतावणी दिधी, कि हेरोद राजा कळे परत नका जायज्यात आणि तेस्नी राजा ले बिगर सांगाणा दुसरा रस्ता कण आपला देश ले चालना ग्यात.
मिसर देश ले जान
13तेस्ना जावा नंतर परमेश्वर ना दूत नि स्वप्न मा योसेफ ले दिखीसन सांग उठ; तो पोऱ्या आणि तेनी माय ले लिसन मिसर देश ले पयजा; आणि जठ लगून तठेच रायजो जठलोंग मी तुले नई सांगाव, कारण कि पोऱ्या ले मारी टाकासाठे हेरोद राजा तेले झामलनार शे.
14तो रात ले उठीसन पोऱ्या ले आणि तेनी माय ले लिसन मिसर देश ले चाली दिना. 15आणि राजा हेरोद ना मरा लगून त्या मिसर देश माच ऱ्हायना; एनासाठे कि तो वचन जो प्रभु नि होशे भविष्यवक्ता द्वारे गैरा पयले सांगेल होता पुरा होवो, कि मनी आपला पोऱ्या ले मिसर मधून बलावना.
हेरोद राजा ना द्वारे धाकला पोरस्ले मारा मा येन
16राजा हेरोद रागे भरी ग्या जव तो समजी ग्या कि बुद्धीमान लोकस्नी तेले धोका दियेल शे. तेनी शिपाईस्ले धाळ कि त्या बेथलेहेम नगर आणि तेना आंगे पांगे ना सर्वा पोरस्ले मारी देवोत ज्या दोन वरीस ना आणि तेना तून धाकला होतात. हय बुद्धीमान लोकस्ना द्वारे तारा ना सर्वास्ना पयले दिखामा येवाना बातमी ना आधार वर होत. 17तव वचन यिर्मया भविष्यवक्ता ना व्दारे संगायेल होत. हय एनासाठे हुईन कारण परमेश्वर नि पुस्तक मा भविष्यवक्ता यिर्मया ना द्वारे प्रभु नि जे सांगेल होता, ते खर हुई जावो.
18“रामा #2:18 रामा रामा एक अशी जागा होती जठे राजा दाविद ना वंश राहत होतात. नगर मा कोनातरी रळाना आवाज लोकस्नी आयक, शोक, रळान आणि मोठा विलाप, राहेल #2:18 राहेल याकोब नि बायको आपला पोरस साठे रळी ऱ्हायंती आणि शांत होवाना नई देखी ऱ्हायंती कारण कि त्या मरी जायेल होतात.”
मिसर देश मधून परत येन
19योसेफ, मरिया आणि धाकला पोऱ्या येशु आते लोंग मिसर देश माच होतात. हेरोद ना मरा नंतर परमेश्वर ना दूत नि मिसर देश मा योसेफ ले स्वप्न मा प्रगट हुईसन सांग. 20उठ बाळ आणि तेनी माय ले लिसन इस्त्राएल देश मा चालना जा, कारण कि राजा हेरोद आणि तेना लोक मरी जायेल शे ज्या बाळ ना जीव लेवाले देखी ऱ्हायनात. 21योसेफ उठना आणि बाळ आणि तेनी माय ले संगे लिसन मिसर ले सोळी दिधा आणि इस्त्राएल देश मा चालना ग्यात. 22पण योसेफ नि हय आयक कि अर्खेलाव आपला बाप हेरोद नि जागा यहूदीया प्रांत वर राज्य करी ऱ्हायनात तो तठे जावाले भ्यायना; नंतर स्वप्न मा परमेश्वर कळून चेतावणी लिसन गालील जिल्हा ना प्रांत मा चालना ग्या. 23आणि नासरेथ नगर जाई बसणा; एनासाठे कि तो वचन पुरा होवो जो भविष्यवक्ता व्दारे येशु ना बारामा सांगेल होत कि तो नासरेथ नगर मधून येणारा सांगाईन.

Dewis Presennol:

मत्तय 2: AHRNT

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda