मत्तय 24:37-39
मत्तय 24:37-39 VAHNT
अन् जसं नुहच्या दिवसात झालं होतं, तसचं माणसाच्या पोराचे येणं राईन. कावून कि जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसामध्ये जोपरेंत नुह जहाजावर चढला नव्हता, त्या दिवसापरेंत लोकं खातपीत जात, अन् त्याच्यात लग्न वगैरे होतं होते, अन् जोपरेंत महापुराने त्यायले वावून नाई नेलं, तवा परेंत त्यायले काहीच मालूम नव्हत, तसेच माणसाच्या पोराचे येणं राईन.