युहन्ना 21:15-17
युहन्ना 21:15-17 VAHNT
जेवण झाल्यावर येशूनं शिमोन पतरसले विचारलं, “हे योहानाच्या पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरसन येशूले म्हतलं, “हो प्रभू; तुले तर माईत हाय, कि मी तुले प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, माह्या शिष्यायची कायजी अशी कर जसं कि ते मेंढरे हाय. येशूनं मंग दुसऱ्यांदा पतरसले म्हतलं, “हे योहानाच्या पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरसन येशूले म्हतलं, “हो प्रभू; तुले तर माईत हाय, कि मी तुले प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, “माह्या शिष्यायची कायजी अशी कर जसं कि ते मेंढरं हाय.” येशूनं तिसऱ्यांदा पतरसले विचारलं, “हे योहानाच्या पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरस उदास झाला, कि येशूनं तिसऱ्यांदा असं म्हतलं, “काय तू माह्यावर प्रेम करते?” अन् त्यानं येशूले म्हतलं, “होय प्रभू, तुले तर सगळं मालूम हाय: तुले तर हे मालूम हाय कि मी तुह्यावर प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, “माह्या मेंढरायची कायजी घे.