युहन्ना 16:22-23
युहन्ना 16:22-23 VAHNT
अश्याच प्रकारे तुमाले पण दुख झाले हाय, पण मी तुमाले परत भेटीन, अन् तुमाले लय आनंद होईन; अन् तुमचा आनंद तुमच्या पासून कोणीहि हिसकावून घेणार नाई. त्या दिवशी, तुमी मले काई विचारसान नाई; मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जर तुमी बापाले माह्या नावान काई मांगसान तर तो तुमाले देईन.