युहन्ना 12
12
बेथानी गावात येशूचा आदर
(मत्तय 26:6-13; मार्क 14:3-9)
1मंग येशू फसह सणाच्या साहा दिवस पहिले बेथानी गावात आला, जती त्याने लाजरला मेलेल्यातून जिवंत केले होते. 2तती त्यायनं त्याच्यासाठी मोठी पंगत देली, अन् येशूचा आदर करण्यासाठी मार्था त्याची सेवा करू लागली अन् लाजर त्या लोकाय पैकी एक होता जो येशूच्या संग जेवण कराले बसला होता. 3तवा मरियानं अर्धा लिटरच्या जवळपास जटामासीच मूल्यवान तेल घेऊन येशूच्या पायावर टाकलं, अन् आपल्या केसायनं त्याचे पाय पुसले, अन् तेलाच्या सुगंधा न घर सुगंधित झालं. 4पण त्याच्या शिष्यायतून यहुदा इस्कोरोती नावाचा एक शिष्य जो त्याले पकडून देऊन रायला होता, म्हणाले लागला, 5“हे तेल तीनशे दिनारात (तीनशे दिवसाची मजुरी) इकून, ते पैसे गरीबायले देऊ शकलो असतो.” 6त्यानं हे गोष्ट याच्यासाठी नाई म्हतली, कावून कि त्याले गरिबायची काळजी होती, पण याच्यासाठी कावून कि तो चोर होता, अन् त्याच्यापासी पैशाची थैली रायत होता, अन् जे काही पैसे त्याच्यात टाकले जात होते, ते तो काढून टाकत होता. 7येशूनं म्हतलं, “ती वेळेच्या पयलेच मले रोयाच्या तयारीसाठी हे करून रायली हाय. 8कावून कि गरीब लोकं तुमच्या संग नेहमी रायतात, पण मी तुमच्या संग नेहमी नाई राहीन”
लाजर ले मारून टाकण्याची योजना
9जवा यहुदी लोकायन हे आयकलं कि येशू तती होता तवा लोकायची एक मोठी गर्दी तती आली; ते फक्त येशूलेच नाई पण लाजर ले पण पाह्याले आले होते, ज्याले त्यानं मेलेल्यातून जिवंत केलं होतं. 10तवा मुख्ययाजकायन लाजर ले पण मारून टाक्याची योजना बनवली. 11कावून कि त्याच्याच्यान लय यहुदी लोकं अन् यहुदी पुढाऱ्यायचा अस्वीकार करून येशूवर विश्वास केला होता.
येशूचे यरुशलेम शहरात विजय-प्रवेश
(मत्तय 21:1-11; मार्क 11:1-11; लूका 19:28-40)
12दुसऱ्या दिवशी लय लोकायन जे सणात आले होते, हे आयकून, कि येशू यरुशलेम शहरात येऊन रायला हाय. 13खजुराच्या डांगा घेतल्या, अन् येशूले भेट्याले गेले, त्याले भेट्याले निघाले, अन् मोठ्यानं म्हणत होते, “देवाची स्तुती हो! धन्य इस्राएल देशाचा राजा, जो प्रभूच्या नावानं येत हाय.” 14जवा येशूले एक गध्याचं पिलू भेटलं, तवा जसा तो यरुशलेम शहरात आला, तो त्याच्यावर बसला. जसं कि पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, 15“हे यरुशलेम शहराच्या लोकायनो, भेऊ नका, पाय तुह्या राजा गध्याच्या पिल्लूवर बसून येते.” 16त्याचे शिष्यायले, ह्या गोष्टी पयले नाई समजल्या होत्या; पण जवा देवानं येशूच्या गौरवाले प्रगट केलं, तवा त्यायले आठोन आली कि, ह्या गोष्टी येशूच्या विषयात पवित्रशास्त्रात लिवलेल्या होत्या, ठिक तसचं झालं; अन् लोकायन त्याच्या संग अशाप्रकारे व्यवहार केला होता. 17तवा गर्दीतल्या लोकायन जे त्यावाक्ती येशू संग होते, त्यायनं हे साक्षी देली कि, येशूनं लाजर ले कब्रेतून बलाऊन मेलेल्यातून जिवंत केलं. 18खूप सारे लोकं येशूले भेट्याले आले, कावून कि त्यायनं या चमत्काराच्या बद्दल आयकलं होतं. 19तवा परुशी लोकायन आपसात म्हतलं “विचार करा, आमी काई नाई करू शकत. कावून कि पहा जगातले लय सारे लोकं त्याच्या मांग जाऊन रायले हाय.”
येशू अन् युनानी
20तती काई युनानी लोकं होते जे फसह सणाच्या वाक्ती आराधना कराले आले होते यरुशलेम शहरात. 21त्यायनं गालील प्रांताच्या बेथसैदा शहरात रायणारा शिष्य फिलिप्पुसच्या घरापासी येऊन त्याले विनंती केली, “श्रीमान आमाले येशूले भेट्याचं हाय.” 22फिलिप्पुसन येऊन आंद्रियासले म्हतलं; मंग आंद्रियास व फिलिप्पुसन येशूले म्हतलं. 23यावर येशूनं त्यायले म्हतलं, “ती वेळ आली हाय, कि माणसाच्या पोराचा गौरव हो. 24मी तुमाले खरं-खरं सांगतो, जवा गव्हाचा दाना जमिनीवर पडून मरते तवा तो लय फळ आणते#12:24 गव्हाचा दाना जमिनीवर पडून मरते तवा तो लय फळ आणते येशू या गोष्टीच्या बद्दल म्हणत होते, कि कसे अन्यजाती विश्वासी येशूच्या मरण अन् मरणातून जिवंत होण्याच्या व्दारे ख्रिस्ताले ओयखतीन. . 25जो आपल्या जीवाले प्रिय जाणतो, तो त्याले गमावून टाकीन; अन् जो जगात आपल्या जीवाले अप्रिय जाणतो, तो अनंत जीवनासाठी त्याले सुरक्षित ठेवीन. 26जर कोणी माह्यी सेवा करीन, तर त्यायनं माह्याले शिष्य बनून माह्य अनुकरण करा; तवा, जती मी हावो तती माह्याला सेवक पण असणार; जर कोणी माह्याली सेवा करीन, तर देवबाप त्याच्या आदर करीन.
आपल्या मरणाच्या बद्दल भविष्यवाणी
27अन् आता मी लय व्याकूळ होऊन रायलो हाय. म्हणून आता मी काय करू? हे बापा, मले या वेदने पासून वाचव पण मी जगात यासाठी आलो, कि दुख उचलु अन् मरून जाऊ. 28हे बापा, आपल्या नावाची गौरव कर.” तवा अभायातून हा आवाज झाला, “मी प्रगट केलं हाय, कि मी किती गौरवशाली हाय, अन् मी याले परत प्रगट करीन.” 29तवा जे लोकं उभे राऊन आवाज आयकून रायले होते, त्यायनं म्हतलं; कि “हे ढगाचा गरजण्याचा आवाज होता,” अन् दुसऱ्यानं म्हतलं, “कोणता तरी देवदूत त्याच्या संग बोलला हाय.” 30यावर येशूनं म्हतलं, “हा आवाज तुमच्या फायद्यासाठी होता, माह्या नाई. 31अन् आता या जगातल्या लोकायचा न्याय करण्याचा वेळ येत हाय, या जगाचा शासक सैतानाच्या शक्तीले नाश करायचा वेळ आला हाय. 32जवा मी जमिनीवरून वरते उचलल्या जाईन, तवा सगळ्या लोकायले आपल्यापासी आणीन.” 33असं म्हणून त्यानं हे प्रगट केलं, कि तो कसा मरणार. 34यावर लोकायन त्याले म्हतलं, “आमी नियमशास्त्रात हे गोष्ट आयकली हाय, कि ख्रिस्त नेहमी जिवंत राईन, तर तू कावून म्हणत कि माणसाच्या पोराले वरते चढवल्या जाणं आवश्यक हाय? हा माणसाचा पोरगा कोण हाय?” 35येशूनं त्यायले म्हतलं, “ऊजीळ#12:35 ऊजीळ येशू आता काहीच वेळे पर्यंत तुमच्या मधात हाय, जवा परेंत, ऊजीळ तुमच्या सोबत हाय, तोपरेंत चालत राहा; असं नाई व्हावं कि अंधार तुमाले घेरून टाकीन; जो अंधारात चालतो त्याले नाई मालूम कि तो कुठे जाते. 36जोपरेंत ऊजीळ तुमच्या संग हाय, ऊजीळावर विश्वास करा, कि तुमी ऊजीळाचे लेकरं बनावे.” ह्या गोष्टी बोलून येशू चालला गेला व स्वताले त्यायच्या पासून लपून ठेवलं.
भविष्यवाणीचे पूर्ण होणे
37अन् येशूनं त्यायच्या समोर एवढे चमत्कार दाखवले, तरी पण त्यायनं त्याच्यावर विश्वास नाई केला; 38हे यासाठी झालं कावून कि यशया भविष्यवक्ताचं वचन पूर्ण व्हावं कि: “हे प्रभू, आमी सांगतलेल्या संदेशावर कोणी पण विश्वास नाई केला, अन् कोणी नाई समजत कि हे तुह्यावाली ताकत होती.” 39म्हणून त्यायले विश्वास ठेवता आला नाई, कि ते विश्वास नाई करू शकले, कावून कि यशया भविष्यवक्त्याने आणखी म्हतलं: 40“त्यानं त्यायचे डोये फुटके केले हाय, कि त्यायनं पाऊ नये, अन् त्यायचे दिमाक बंद केले, कि त्यायनं समजू नये, असं नाई व्हावं कि ते माह्याकडे फिरतीन अन् मी त्यायले चांगलं करावं.” 41यशया भविष्यवक्त्याने हे गोष्टी याच्यासाठी म्हतल्या कि, त्यानं येशूचा गौरव पायला; अन् त्यानं त्याच्या विषयात म्हतलं. 42तरी पुढाऱ्या मधून लय लोकायन त्याच्यावर विश्वास केला, पण परुशी लोकायच्यानं उघडपणे नाई मानत होते, ह्या भितीनं कि त्यायले धार्मिक सभास्थानातून बायर काढून टाकल्या जाईन. 43कावून कि माणसाच गौरव त्यायले देवाच्या गौरवा पेक्षा जास्त चांगला वाटत होता.
ऊजीळात चालणे
44तवा येशूनं गर्दीले आवाज देऊन म्हतलं, “जो माह्यावर विश्वास करतो, तो माह्यावर नाई, पण मले पाठवणाऱ्या देवावर विश्वास करते. 45अन् जो मले पायते, तो माह्या पाठवणाऱ्याले पायते. 46मी जगाचा ऊजीळ बनून आलो हाय, कि जो कोणी माह्यावर विश्वास करीन, तो अंधारात नाई राहीन. 47जर कोणी माह्या संदेश आयकून त्याच्यावर विश्वास नाई करत, तर मी त्याले दोषी नाई ठरवणार, कावून कि मी जगातल्या लोकायले दोषी ठरव्याले नाई आलो, पण जगातल्या लोकायले वाचवाले आलो हाय. 48जो मले बेकार समजतो, अन् माह्या संदेश स्वीकार करत नाई, त्याचा न्याय करणारा एकच हाय: म्हणजे जो संदेश मी सांगतला हाय, ते आखरीच्या दिवसाला त्याले दोषी ठरवणार. 49कावून कि मी स्वताच्या अधिकारानं संदेश नाई देत, पण देवबाप ज्याने मले पाठवले हाय, त्यानचं मले आज्ञा देली हाय, कि काय-काय सांगू अन् काय-काय बोलू. 50अन् मले मालूम हाय, कि त्याच्या आज्ञाचं पालन करणे अनंत जीवन देते, म्हणून मी तुमाले तेच सांगतो जे तो मले म्हणते.”
Currently Selected:
युहन्ना 12: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.