YouVersion Logo
Search Icon

मत्तय 7:24-29

मत्तय 7:24-29 MRCV

“यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले. पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.” येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले. कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.