इब्री 8
8
नव्या कराराचा प्रमुख याजक
1आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक प्रमुख याजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनावर उजव्या हाताला बसलेले आहेत. 2प्रभुने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहे.
3आणि ज्याअर्थी प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे. 4जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे नेमलेले याजक अगोदरच असतात. 5जे स्वर्गात आहे त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविण्यात आलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणे सर्व हुबेहूब करण्याकडे लक्ष ठेवावे असे त्याला सांगितले होते.”#8:5 निर्ग 25:40 6परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे कारण नवीन करार ज्याचा ते मध्यस्थ आहे अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित आहे.
7जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. 8परंतु परमेश्वराला माणसातील दोष दिसले, आणि ते म्हणालेः
“प्रभू जाहीर करून म्हणत आहेत,
असे दिवस येत आहेत की इस्राएली लोकांबरोबर
आणि यहूदाच्या लोकांबरोबर
मी एक नवा करार करीन.
9त्यांच्या पूर्वजांशी केला
त्या करारासारखा हा करार असणार नाही.
जेव्हा मी हात धरून त्यांना
इजिप्त देशातून बाहेर काढले,
कारण ते मी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाहीत
म्हणून मी त्यांच्यापासून दूर गेलो,
असे प्रभू म्हणतात.
10परंतु त्या वेळेनंतर इस्राएलच्या लोकांबरोबर मी हा करार स्थापन करीन,
असे प्रभू म्हणतात.
मी माझे नियम त्यांच्या मनपटलावर घालेन,
त्यांच्या अंतःकरणावर लिहीन.
मग मी त्यांचा परमेश्वर होईन
आणि ते माझे लोक होतील.
11त्यावेळी ते आपल्या शेजार्याला शिकविणार नाहीत,
अथवा प्रत्येक आपल्या बंधू आणि भगिनींना, ‘तुम्ही प्रभूला ओळखावे,’ असे सांगण्याची गरज राहणार नाही,
कारण प्रत्येकजण मला ओळखेल,
लहानापासून थोरापर्यंत.
12मग मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन
व इतःपर त्यांची पापे स्मरणार नाही.”#8:12 यिर्म 31:31-34
13त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल.
Currently Selected:
इब्री 8: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.