YouVersion Logo
Search Icon

इब्री 5

5
1प्रत्येक प्रमुख याजक परमेश्वर विषयक गोष्टींबाबत लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व पापांसाठी देणग्या आणि यज्ञे अर्पण करण्यासाठी निवडला जातो. 2तो स्वतः निर्बलतेच्या अधीन असल्यामुळे अज्ञानी व भटकलेल्या लोकांबरोबर सौम्यतेने वागू शकतो. 3या कारणासाठीच त्याला स्वतःच्या पापांसाठी आणि लोकांच्या पापांसाठी यज्ञ करावा लागत असे. 4आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो.
5त्याचप्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला प्रमुख याजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले,
“तू माझा पुत्र आहे;
आज मी तुझा पिता झालो आहे.”#5:5 स्तोत्र 2:7
6आणखी दुसर्‍या ठिकाणी ते असे म्हणाले,
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू सदासर्वकाळचा याजक आहे.”#5:6 स्तोत्र 110:4
7येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्युपासून वाचवण्यास जे समर्थ आहे, त्याच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली, आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली. 8ते पुत्र होते, तरी त्यांनी सोसलेल्या दुःख सहनाद्वारे ते आज्ञापालन शिकले. 9आणि परिपूर्ण केला गेल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्‍या सर्वांचे अनंतकाळचे तारणदाता झाले, 10आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
मार्गभ्रष्ट न होण्याबाबत इशारा
11याबाबतीत आम्हाला खूप सांगायचे वाटते, परंतु हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. 12-13वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे! आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे, आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाचे शिक्षणाविषयी अपरिचित आहे. 14परंतु जड अन्नाचे सेवन प्रौढांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात.

Currently Selected:

इब्री 5: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in