2 थेस्सलनीकाकरांस 1
1
1आपले परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेली थेस्सलनीका येथील मंडळीस,
पौल, सीलास व तीमथ्य यांच्याकडून:
2परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो.
उपकारस्तुती आणि प्रार्थना
3बंधू आणि भगिनींनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे. 4यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षामध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो.
5परमेश्वराचा न्याय योग्य आहे याचे हे सर्व प्रमाण आहे आणि याचा परिणाम म्हणजे ज्या परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्यासाठी तुम्ही पात्र ठरावे. 6परमेश्वर न्यायी आहे: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. 7प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. 8जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंचे शुभवार्ता पाळत नाही त्यांना ते शिक्षा देतील. 9सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभुच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील. 10त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना आश्चर्यचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
11हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाचे प्रत्येक कृत्य त्यांच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो. 12प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे.
Currently Selected:
2 थेस्सलनीकाकरांस 1: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.