YouVersion Logo
Search Icon

1 योहान 4

4
आत्म्यांची परीक्षा करा
1प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत. 2याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे. 3परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे.
4प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा तुम्हामध्ये जे आहेत, ते श्रेष्ठ आहेत. 5हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते. 6आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. यामुळेच आम्ही समजतो की सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता आहे.
परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती
7प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहे आणि ते परमेश्वराला ओळखतात. 8परंतु जे प्रीती करीत नाही, ते परमेश्वराला ओळखीत नाही, कारण परमेश्वर प्रीती आहे. 9परमेश्वराने त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे त्यांनी आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केली. 10प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले. 11प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. 12परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होत जाते.
13ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा म्हणून त्यांनी आपला स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. 14आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. 15येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकारतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात, आणि ते परमेश्वरामध्ये राहतात. 16परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो.
परमेश्वर प्रीती आहे. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. 17अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला धैर्य प्राप्त व्हावे. या जगात आपण येशू सारखे आहोत. 18प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
19आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो कारण प्रथम त्यांनी आम्हावर प्रीती केली. 20जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनसुद्धा त्यांच्यावर प्रीती करीत नाही तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाही, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही. 21परमेश्वराने स्वतः आज्ञा केली आहे की, जर कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.

Currently Selected:

1 योहान 4: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in