YouVersion Logo
Search Icon

2 तीमथ्य प्रस्तावना

प्रस्तावना
पौलाचे तीमथ्यला दुसरे बोधपत्र म्हणजे तीमथ्य ह्या पौलाच्या तरुण सहकाऱ्याला व साहाय्यकाला पौलाने केलेला व्यक्तिगत उपदेश आहे. ह्या पत्राचा मुख्य विषय चिकाटी हा आहे. तीमथ्यने दुःखाचा व विरोधाचा सामना करीत प्रभू येशूची निष्ठेने साक्ष देत राहावे, शुभवर्तमानाच्या व जुन्या कराराच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहावे आणि एक धर्मशिक्षक व शुभवर्तमानप्रचारक म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडीत राहावे, असा त्याला उपदेश केलेला आहे.
मूर्ख व निरर्थक वितंडवादात पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी तीमथ्यला विशेष प्रकारे सावध करण्यात आलेले आहे; कारण अशा प्रकारच्या वादविवादामुळे कोणतेही हित साधले जात नाही व जे लोक हे सर्व ऐकत राहतात त्यांची अधोगती होते.
तीमथ्यला हा सर्व बोध केला जात असताना त्याच्यापुढे पत्रलेखकाने स्वतःच्या जीवनाचे उदाहरण ठेवलेले आहे. पौलाची श्रद्धा, सहनशीलता, प्रीती, चिकाटी व छळ होत असताना त्याने सहन केलेले दुःख ह्या सर्वांचे स्मरण उदाहरणादाखल करून देण्यात आलेले आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
प्रशंसा व उपदेश 1:3-2:13
इशारा आणि बोध 2:14-4:5
पौलाचे स्वतःचे उदाहरण 4:6-18
समारोप 4:19-22

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in