YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 71

71
वृद्धाची प्रार्थना
1हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
2मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव;
तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
3मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो;
तू मला तारावयास आज्ञा दिली आहे,
कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
4हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव,
अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
5कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस.
मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
6गर्भापासून तूच माझा आधार आहेस;
माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले;
माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
7पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे;
तू माझा बळकट आश्रय आहे.
8माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने
आणि सन्मानाने भरलेले असो.
9माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको;
जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.
10कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत;
जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.
11ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे;
त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही.
12हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस;
माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!
13जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर,
जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक.
14पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन,
आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
15माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे
आणि तारणाविषयी सांगत राहील,
जरी मला ते समजले नाही.
16प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन;
मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन.
17हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस;
आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.
18खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे,
तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत,
हे देवा, मला सोडू नको.
19हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे;
हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
20ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली,
तो तू मला पुन्हा जिवंत करशील;
आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
21तू माझा सन्मान वाढव;
आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
22मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन,
हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन;
हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू,
मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
23मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने
आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
24माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल;
कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in