YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 62

62
आपली भिस्त केवळ देवावर
दाविदाचे स्तोत्र
1माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;
त्याच्यापासून माझे तारण येते.
2तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
3झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या,
एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण
किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
4त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात;
त्यांना लबाड बोलण्यास आवडते;
ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
5हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
6तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
7माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे;
माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
8अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;
देव आमच्यासाठी आश्रय आहे.
9खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत;
वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
10दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका;
आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
11देव एकदा बोलला आहे,
मी दोनदा ऐकले आहे,
सामर्थ्य देवाचे आहे.
12हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे.
कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in