स्तोत्र. 127
127
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते
1परमेश्वर जर घर बांधीत नाही,
तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे.
जर परमेश्वर नगर रक्षित नाही,
तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
2तुम्ही पहाटे लवकर उठता,
रात्री उशीराने घरी येता,
किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे
कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
3पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
4तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
5ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.
Currently Selected:
स्तोत्र. 127: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.