YouVersion Logo
Search Icon

नीति. 12

12
1ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय,
परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
2परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो,
पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.
3दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही,
पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
4सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे,
परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
5नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात,
पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
6दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात,
परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात.
7दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात,
पण नीतिमानाचे घर टिकते.
8मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते,
पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो.
9जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते;
त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.
10नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो,
पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते.
11जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते,
पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.
12दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो,
पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते.
13दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो,
पण नीतिमान संकटातून निसटतो.
14मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो,
त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.
15मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो,
परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो.
16मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो,
पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
17जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो,
पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.
18कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो,
पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
19सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल,
पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
20वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते,
परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.
21नीतिमानावर संकटे येत नाहीत,
परंतु दुर्जनावर अडचणी येतात.
22खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे,
पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
23शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो,
पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
24उद्योग्याचे हात अधिकार चालवतील,
पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
25मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते,
पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
26नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो,
पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.
27आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही,
पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
28न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते,
आणि त्यांच्या वाटेत मरण नाही.

Currently Selected:

नीति. 12: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in