YouVersion Logo
Search Icon

ईयो. 18

18
दुष्टाच्या अंताचे बिल्दद वर्णन करतो
1नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
2तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
3आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस,
आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?
4रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या,
तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय,
किंवा खडक त्याची जागा सोडेल का?
5खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल.
त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
6त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
7त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील.
8त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील.
तो खडकाळ मार्गाने चालला आहे.
9सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
10जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
11दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे.
भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
12वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत.
विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.
13भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल.
खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.
14त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल.
त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
15जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील
त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.
16त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
17पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही.
आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.
18लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील.
आणि त्याना या जगातून पळवून लावतील.
19त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत.
तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही.
20पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल.
आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील.
21दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”

Currently Selected:

ईयो. 18: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in