YouVersion Logo
Search Icon

होशे. 9

9
सततच्या बेइमानीमुळे इस्त्राएलाला शिक्षा
1हे इस्राएला,
इतर लोकांसारखा आनंद करु नको,
कारण तू आपल्या देवाला सोडून
अविश्वासू झाला आहेस,
तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते.
2पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही,
नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल.
3ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत,
त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल,
आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ#काही खाद्यपदार्थ हे औपचारिकरीत्या अशुद्ध आहेत, म्हणून त्यांना खाऊ नये असे मोशेचे नियमशास्त्र जाहीर करते. खातील.
4ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही,
व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत,
त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल
जे ते खातील ते अशुद्ध होतील,
कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल,
ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही.
5परमेश्वराच्या सणाच्या दिवशी
नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?
6कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर,
मिसर त्यांना एकत्र करील
आणि मोफ त्यांना मुठमाती देईल,
वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील
आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.
7शासन करण्याचे दिवस येत आहेत,
प्रतिफळाचे दिवस येत आहेत,
इस्राएल हे जाणणार,
तुझ्या महापातकामुळे,
वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.
8संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे,
तो एफ्राईमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे
आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे.
9गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले
त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे.
देव त्यांच्या अधर्माची आठवण करून
त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे.
10परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला
तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता,
अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले
पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले
ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.
11एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल
तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.
12जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन
ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार
यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!
13मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला
पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.
14त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे
गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.
15कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे,
तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला.
त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून
त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार
नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.
16एफ्राईम रोगी आहे
त्यांचे मूळ सुकून गेले आहे,
त्यास फळ येणार नाही,
त्यांना जरी मुले झाली
तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.
17माझा देव त्यांना नाकारेल
कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही,
ते देशोदेशी भटकणारे होतील.

Currently Selected:

होशे. 9: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in