YouVersion Logo
Search Icon

इब्री. 8

8
यहूद्यांच्या याजकपणाहून प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ
1आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे, 2तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे.
3प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते. 4जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. 5ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.” 6परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.
नवा करार
यिर्म. 31:31-34
7जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती.
8परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला,
परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत,
जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.
9ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही.
त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले,
ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे
मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो.
10त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन,
त्यांच्या हृदयांवर ते लिहीन,
मी त्यांचा देव होईन,
ते माझे लोक होतील.
11तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला
अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही,
कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत
सर्वजण मला ओळखतील.
12कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन.
आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.
13या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.

Currently Selected:

इब्री. 8: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in