YouVersion Logo
Search Icon

तीत 2:11-15

तीत 2:11-15 MARVBSI

कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’ ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.