स्तोत्रसंहिता 92
92
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती
शब्बाथ दिवशी गायचे संगीतस्तोत्र.
1परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे.
2प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे,
3दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे.
4कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो.
5हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत
6पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,
7दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.
8हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ उच्च स्थानी आहेस.
9हे परमेश्वरा, पाहा, तुझे वैरी, पाहा, तुझे वैरी नाश पावतील; सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.
10पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस, मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे.
11माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत.
12नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
13जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.
14वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;
15ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 92: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.