स्तोत्रसंहिता 82
82
विपरीत न्यायाला दूषण देणे
आसाफाचे स्तोत्र.
1देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;
2“तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल?
(सेला)
3गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या.
4गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा; दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.”
5त्यांना माहिती नाही व कळतही नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत.
6मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.
7तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.”
8हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 82: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.