YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 53

53
मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा
(स्तोत्र. 14:1-7)
मुख्य गवयासाठी; महलथ ह्या चालीवर गायचे दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही.” लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करतात; सत्कृत्य करणारा कोणी नाही.
2कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले.
3ते एकूणएक मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकंदर सर्व बिघडले आहेत; सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही.
4दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव घेत नाहीत.
5पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.
6देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 53