YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 29

29
तुफानात परमेश्वराची वाणी
दाविदाचे स्तोत्र.
1अहो दिव्यदूतहो,1 परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या.
2परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
3परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे; प्रतापशाली देव गर्जना करीत आहे; परमेश्वर जलाशयांवर आहे.
4परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे; परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.
5परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडतो; परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करतो.
6तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो; लबानोन व शिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो.
7परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदतो.
8परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करतो; परमेश्वर कादेशचे वन कंपित करतो.
9परमेश्वराचा ध्वनी हरिणींना गर्भ गाळण्यास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करतो; त्याच्या मंदिरात सर्वत्र “महिमा! महिमा!” असा ध्वनी दुमदुमतो.
10परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.
11परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 29