YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 140

140
छळणार्‍यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडव; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर.
2ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात,
3ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे.
(सेला)
4हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात.
5गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात.
(सेला)
6मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
7हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस.
8हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल.
(सेला)
9ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
10त्यांच्यावर इंगळ पडोत; ते अग्नीत टाकले जावोत, ज्यांतून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचांत ते टाकण्यात येवोत.
11दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
12परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे.
13नीतिमान तुझ्या नावाचे उपकारस्मरण खचीत करतील; सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in