YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 135

135
परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता
1परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा;
2परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा.
3परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे.
4कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे.
5परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो.
6परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.
7तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
8त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.
9हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले.
10त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले;
11अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;
12आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला.
13हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.
14कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
15राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.
16त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही.
17त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
18त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
19हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर;
20हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
21यरुशलेमेत वस्ती करणार्‍या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in