स्तोत्रसंहिता 120
120
कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना
आरोहणस्तोत्र.
1मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने माझे ऐकले.
2“हे परमेश्वरा, लबाडी करणार्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव.”
3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल? तुला आणखी काय मिळणार?
4वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे.
5हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्यांजवळ राहतो.
6शांततेचा द्वेष करणार्यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे.
7मी शांतताप्रिय आहे, तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 120: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.