YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 113

113
दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती
1परमेशाचे स्तवन करा!1 परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा.
2येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो.
3सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
4परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे; त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे;
5परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे,
6जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे?
7तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो;
8आणि त्यांना अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो.
9तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेशाचे स्तवन करा!1

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in