YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 111

111
परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो
1परमेशाचे स्तवन करा!1 सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.
2परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.
3त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
4आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे; परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे.
5त्याने आपले भय धरणार्‍यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो.
6त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.
7त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
8ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत.
9त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.
10परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 111