YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 11

11
सरळतेने चालणार्‍याचा आधार
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1मी परमेश्वराचा आश्रय केला आहे; तर मग तुम्ही माझ्या जिवाला असे का म्हणता की, “तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा?
2कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत;
3आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार?”
4परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.
5परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.
6दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.
7कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in