YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 1:1-4

स्तोत्रसंहिता 1:1-4 MARVBSI

जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.