YouVersion Logo
Search Icon

गणना 1

1
सीनाय येथे झालेली इस्राएल लोकांची शिरगणती
1इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला, 2“इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर;
3वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे जितके इस्राएल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या-त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
4प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या.
5तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
6शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल;
7यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
8इस्साखार वंशातला सूवाराचा मुलगा नथनेल;
9जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
10योसेफपुत्रांच्या वंशात म्हणजे एफ्राईम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल;
11बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान;
12दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;
13आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पगीयेल;
14गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
15नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.”
16मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.
17ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,
18आणि दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमवली; तेव्हा इस्राएल लोकांनी आपापले कूळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यांना अनुसरून वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली.
19परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
20इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
21रऊबेन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
22शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
23शिमोन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकोणसाठ हजार तीनशे भरली.
24गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
25गाद वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.
26यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
27यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्‍याहत्तर हजार सहाशे भरली.
28इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
29इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे भरली.
30जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
31जबुलून वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती सत्तावन्न हजार चारशे भरली.
32योसेफपुत्रांपैकी एफ्राईम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
33एफ्राईम वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे भरली.
34मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
35मनश्शे वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे भरली.
36बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
37बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे भरली.
38दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
39दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे भरली.
40आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
41आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे भरली.
42नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
43नफताली वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती त्रेपन्न हजार चारशे भरली.
44मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली.
45ह्या प्रकारे इस्राएल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून इस्राएलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली,
46त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास भरली.
निवासमंडपाच्या सेवेसाठी लेव्यांची नेमणूक
47परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही.
48कारण परमेश्वर मोशेला म्हणाला होता की,
49“इस्राएल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये; इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये;
50तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत.
51निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.
52इस्राएल लोकांनी आपापले डेरे आपापल्या दलांनुसार आपापल्या छावणीत आपापल्या निशाणाजवळ ठोकावेत;
53पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”
54इस्राएल लोकांनी ह्याप्रमाणे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्वकाही केले.

Currently Selected:

गणना 1: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for गणना 1