मत्तय 3
3
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
1त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की,
2“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
3त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की,
“अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”
4ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.
5तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला.
6त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.
7परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?
8ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;
9आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
10आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.
11मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.
12त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”
येशूचा बाप्तिस्मा
13तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला.
14परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?”
15येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले.
16मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला,
17आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’
Currently Selected:
मत्तय 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.