मत्तय 2:10-12
मत्तय 2:10-12 MARVBSI
तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.